मुंबई - अजित पवार यांची बंडखोरी झाल्यानंतर सत्तेत आलेल्या अजित पवार गटाचे पहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी व शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात आजपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले आहे.
Live Updates:
- उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास ठराव असताना त्यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक व कायदेशीर नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्या पदावर बसू शकत नाहीत.नीलम गोऱ्हे यांना 14 दिवसांत नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. हे सरकार बहुमताच्या जोरावर माजले आहे. उपसभापतींनी काम करू नये, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी माध्यमांशी सांगितले आहे.
- विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभापतींवर आक्षेप घेत नसल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी विधानपरिषदेतून सभात्याग केला आहे. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
-
#WATCH | Mumbai | MLAs of MVA (Maha Vikas Aghadi) protest outside the Maharashtra Assembly against the State Government, over various issues. pic.twitter.com/H2b4v360AA
— ANI (@ANI) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai | MLAs of MVA (Maha Vikas Aghadi) protest outside the Maharashtra Assembly against the State Government, over various issues. pic.twitter.com/H2b4v360AA
— ANI (@ANI) July 17, 2023#WATCH | Mumbai | MLAs of MVA (Maha Vikas Aghadi) protest outside the Maharashtra Assembly against the State Government, over various issues. pic.twitter.com/H2b4v360AA
— ANI (@ANI) July 17, 2023
-
- विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. विधिमंडळातदेखील विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पेरणी न झाल्यास आपतकालीन प्लॅन- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की 50 हजार शेतकऱ्यांना मदत केली आहे. सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. पेरणी न झाल्यास आपतकालीन प्लॅन आहे. बियाणे जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येणार आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर चर्चा करावाी. सरकार खातेवाटप, दिल्ली व राजकारणात दंग आहे. त्यांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आहे.
शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड व अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी सर्व आमदारांना व्हीप बजाविला आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा आज व्हीप चालणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार, गटाचे मंत्री व आमदार यांनी यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चर्चा केली आहे.
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या विरोधक आक्रमक झाले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले, म्हणाले, की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. सरकारला जाब विचारण्याची काँग्रेसची भूमिका आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. हायकमांडने निर्णय दिल्यानंतर विरोधकांचे नाव जाहीर करणार आहोत, पटोले यांनी सांगितले.
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत. घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो, असे बॅनर काँग्रेसच्या नेत्यांनी हाती घेतले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे आमदारदेखील उपस्थित राहिले. विरोधकांची घोषणाबाजी करताना शरद पवार गटाचा एकही आमदार दिसून आला नाही.
- उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते विधानभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.
- शरद पवार गटाने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांपासून वेगळी आसन व्यवस्था करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. जयंत पाटील यांची आसन व्यवस्था सत्ताधारींच्या बाकाजवळ करण्यात आली आहे.
प्रश्न सोडविण्याचे फडणवीस यांच्याकडून आश्वासन- पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होताना बहुमताचे आकडे कितीही असले तरी सरकार विधानसभेतील सध्याच्या पदाचा गैरवापर करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. विरोधी पक्ष असलेले अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षांची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. जनतेच्या हिताशी संबंधित प्रश्न विरोधकांकडून मांडल्यानंतर सरकार सोडविणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनापूर्वी काय घडले?
- काँग्रेसकडून विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून दावा केला जाणार आहे, मात्र विधान परिषेदत असा दावा केला जाणार नाही.
- रविवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात चहापानाचे आयोजन करण्यात आले. नेहमीप्रमाणे विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
- अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करत असून पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत शिवसेना आणि काँग्रेससोबत पक्ष बसणार आहे.
राज्यात विरोधी पक्ष आहे का? पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, की विविध प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधकांकडून तसे होत नाही. विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. चांगल्याला चांगले म्हणण्याची बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिली. मात्र, विरोधकांना काहीही चांगले दिसत नाही. राज्यात विरोधी पक्ष आहे का, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हेही वाचा-
- Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका
- Monsoon Session 2023 : विरोधी पक्षनेताच सत्तेत गेला; पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा फुसका बार होण्याची शक्यता
- Congress On Opposition Leader: खोक्यावर खोके, एकदम ओके; विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणार - बाळासाहेब थोरात