ETV Bharat / state

Ajit Pawar on Base Camp: रायगड जिल्ह्यात एनडीआरएफचा बेस कॅम्प करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार - Ajit Pawar in Monsoon session

राज्यातील पूरजन्य परिस्थितीबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. सरकार सर्व बाबींवर नियंत्रण ठेवत आहे, तर रायगड जिल्ह्यात एनडीआरएफचा बेस कॅम्प तयार करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Jul 24, 2023, 2:16 PM IST

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. राज्यातील पूरजन्य परिस्थिती आणि पाऊस यावरून आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार, आमदार नाना पटोले यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काही ठिकाणी पुरामुळे शेतीचे नुकसान होत आहे, तर काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या संदर्भात राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या, याबाबत तातडीने सभागृहात माहिती द्यावी अशी मागणी आमदारांनी केली.

सर्वांना योग्य मदत दिली जाईल : या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले की, राज्य सरकारने राज्यातील पूर परिस्थितीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असून पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्या संदर्भात जिथे शक्य आहे तेथे स्थलांतर आणि जिथे शक्य आहे तिथे मदत केली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सातत्याने 'कोसळणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या दरडी' लक्षात घेता, या भागामध्ये एनडीआरएफचे बेस कॅम्प तयार करण्याबाबत आमदार संजय कुटे यांनी सूचना केली आहे. त्याप्रमाणे या भागात एनडीआरएफचे कॅम्प करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

अन्नधान्य पुरवठा केला जाईल : दरम्यान राज्यात ज्या ठिकाणी नागरिकांचे अचानक स्थलांतर करावे लागले आहे, अशा नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. हा अन्नधान्याचा पुरवठा मोफत असेल. तसेच जर त्यांना अन्य शिजवणे शक्य नसेल, तर त्यांच्यापर्यंत शिजवलेले अन्य कसे पोहोचवले जाईल याबाबतही राज्य सरकार प्रयत्न करत आहे. एकूणच राज्यातील संपूर्ण पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत राज्य सरकार सभागृहात निवेदन करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नुकतीच इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. त्यात 27 जण मृत्युमुखी तर अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. म्हणुन, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

हेही वाचा :

  1. Maharashtra Monsoon session 2023 Updates: अमोल मिटकरी, मनीषा कायंदे यांना निधी भेटायला हवाच-सचिन अहिर यांचा सत्ताधाऱ्यांना टोला
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर प्रकरणावरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ, राज्यसभा 2 वाजेपर्यंत तहकूब
  3. Amit Thackeray : साहेबांमुळे 65 टोलनाके बंद, आता माझ्यामुळे एक बंद'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.