ETV Bharat / state

Monsoon Update : राज्यात अखेर मान्सून सक्रिय; पुढील पाच दिवस 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा - महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रात अखेर प्रवेश केला आहे. याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र हवामान विभागाने दिली आहे. तसेच येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने रविवारी दिला आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 25, 2023, 6:15 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याचे अधिकृत उत्तर आज महाराष्ट्र हवामान विभागाने दिले आहे. महाराष्ट्रात मान्सून आजपासून सक्रिय झाला असल्याची माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिली आहे. त्यामु्ळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.

  • #WATCH | Mumbai, Maharashtra: Sushma Nair, Scientist IMD Maharashtra speaks on Monsoon in Maharashtra, "Today, on June 25, 2023, monsoon has entered the state of Maharashtra, including Mumbai...In the last 24 hours, there was heavy to very heavy rainfall at many places in… pic.twitter.com/JweZLvBP80

    — ANI (@ANI) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुढील पाच दिवस मुसळधार - आज (5 जून 2023) मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गेल्या 24 तासात जोरदार ते अति मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील विविध भागात झाला आहे. सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पश्चिम घाट पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे- सुषमा नायर, वैज्ञानिक, महाराष्ट्र IMD

बळीराजा सुखावणार - जून महिना सुरू होताच शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागते. हवामान विभागाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. शेतीची मशागत करून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळ आले आणि मान्सून राज्यात दाखल होण्यास उशिर झाला. अखेर रविवारपासून राज्यात मान्सून सक्रिया झाल्याची अधिकृत माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईची तुंबई - मुंबई - शहरात जोरदार पाऊस झाला असून मागील २४ तासात पडलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यात पाणी भरल्याने बरीच वाहने बंद पडली होती. अनेक ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली होती. एका दिवसातच पावसाने मुंबईची दैना केली आहे.

हेही वाचा -

  1. mumbai rain : मान्सूनच्या पावसाची सुरुवात होताच थिरकले मुंबईकर, कुठे खेळला गरबा तर कुठे तुंबईमुळे नागरिकांची तारांबळ
  2. Monsoon Health Tips: आला पावसाळा, तब्येत सांभाळा! पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी
  3. Monsoon in Maharashtra : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; मुंबईसाठी यलो अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.