मुंबई - अनेक दिवसांपासून दडी मारल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे मुंबईतील हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकर काहीसे सुखावले आहेत. त्यात मान्सून आजपासून पूर्णतः सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पण आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार 30 जूननंतरच मान्सून हा मुंबईत पूर्णपणे सक्रिय होणार आहे.
-
Current district & station Nowcast warnings at 1540 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
https://t.co/o69UesWG7D
https://t.co/Tx4GDKCcFw
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJY2d0 pic.twitter.com/eSY3AK65pX
">Current district & station Nowcast warnings at 1540 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023
https://t.co/o69UesWG7D
https://t.co/Tx4GDKCcFw
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJY2d0 pic.twitter.com/eSY3AK65pXCurrent district & station Nowcast warnings at 1540 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023
https://t.co/o69UesWG7D
https://t.co/Tx4GDKCcFw
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJY2d0 pic.twitter.com/eSY3AK65pX
काश्मिरात मान्सून दाखल - महाराष्ट्रापासून कोसे दूर असलेल्या जम्मू-काश्मिरात सध्या मान्सून दाखल झाला आहे. अंदमान निकोबार हे मान्सुनसाठी प्रवेशद्वार आहे. त्यानंतर मान्सून हा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणामार्गे महाराष्ट्रात दाखल होता. महाराष्ट्रामार्गे हा मान्सून पुढे गुजरात आणि त्यापुढे नॉर्थ भारतात प्रवेश करतो. पण सध्याची स्थिती पाहता मान्सून हा महाराष्ट्रापासून दूर असलेल्या काश्मिरात दाखल झाला आहे. पण, महाराष्ट्रात अजून पूर्णपणे तो सक्रिय झालेला नाही. मुंबईला समुद्रकिनारा असूनही मान्सून मुंबईत दाखल होण्यास उशीर होत आहे. पण हाच मान्सून जम्मू-काश्मिरात दाखल झाला आहे.
बिपरजॉयमुळे मान्सून लेट- मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सून हळूहळू सक्रीय होताना दिसत आहे. दरवर्षी राज्यात पावसाला ७ जून रोजी सुरुवात होते. पण यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता. कोकणात ११ जून रोजी मान्सून थोड्याफार प्रमाणात आल्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. आजपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. पण हा मान्सून पूर्णपण सक्रिय होण्यास 30 जून ही तारीख उजाडेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
Heavy rainfall warning with expected impact and recommended action.#india #heavyrain #WeatherUpdates@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/hJYNXOpRMy
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Heavy rainfall warning with expected impact and recommended action.#india #heavyrain #WeatherUpdates@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/hJYNXOpRMy
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023Heavy rainfall warning with expected impact and recommended action.#india #heavyrain #WeatherUpdates@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/hJYNXOpRMy
— India Meteorological Department (@Indiametdept) June 23, 2023
मुंबईत पाऊस - हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढणार असल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. मुंबईत आज पूर्णतः ढगाळ वातावरण होते. मुंबईसहित कोकण पट्ट्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. या जून महिन्यात आत्तापर्यंत २०.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीपेक्षा ८१ टक्क्यांनी कमी आहे.
पुढील तीन-चार दिवसात देशभरात मान्सून सक्रिय - भारतीय हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या उर्वरित भागांमध्ये, पूर्व मध्य प्रदेशातील आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 2 दिवसांत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्येही मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवसांत नैऋत्य मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, असे हवामान खात्याच्या अंदाजाने म्हटले आहे.
-
Happy Monsoon Day Mumbai. From here on gradually rains will intensify. Around Tuesday could be First 100mm rainy day. #MumbaiRains pic.twitter.com/zyUdvrInt1
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy Monsoon Day Mumbai. From here on gradually rains will intensify. Around Tuesday could be First 100mm rainy day. #MumbaiRains pic.twitter.com/zyUdvrInt1
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) June 24, 2023Happy Monsoon Day Mumbai. From here on gradually rains will intensify. Around Tuesday could be First 100mm rainy day. #MumbaiRains pic.twitter.com/zyUdvrInt1
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) June 24, 2023
मान्सून होणार सक्रिय - उत्तर-पश्चिम भारत, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये वादळासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दुसरीकडे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली तसेच पूर्व राजस्थानमध्ये 25 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा -