कठुआ अत्याचार प्रकरणी ७ पैकी ६ आरोपी दोषी, पठाणकोट न्यायालयाचा निर्णय
पठाणकोट - जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट कोर्टाने सरपंच सांझी रामसह ६ आरोपींना दोषी ठरवले आहे. सात आरोपींपैकी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी या प्रकरणातील ७ आरोपींविरोधात सुनावणी झाली. दुपारी २ पर्यंत त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर -
नाटक जगणारा अवलिया काळाच्या पडद्याआड; गिरीश कर्नाड यांनी बंगळुरात घेतला अखेरचा श्वास
मुंबई - प्रसिद्ध नाटककार, ज्येष्ठ अभिनेते, लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. वाचा सविस्तर -
'परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण'
मुंबई - परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण आल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवत आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत 'राष्ट्रवादी काँग्रेस दिंडी' काढण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर -
रतन टाटा संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला येण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमांत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा येणार की नाही यावर सस्पेन्स वाढला आहे. संघाच्या कार्यक्रमात रतन टाटा येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने यावर्षी प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीतच या कार्यक्रमाचा समारोप होणार असे दिसत आहे. वाचा सविस्तर -
समुद्रात कार वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; वसईच्या समुद्र किनाऱ्यावरील घटना
पालघर - वसईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कार समुद्रात वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.वाचा सविस्तर -