भाजप नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; घटनेपूर्वी केला व्हिडिओ
अहमदनगर - श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी व्यावसायिकाने स्वतः त्याच्यावर झालेला अन्याय मांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रभाकर उर्फ बाळासाहेब कर्नाटकी असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर -
राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला
मुंबई - एकीकडे राज्यात दुष्काळामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. तर, दुसरीकडे उष्णतेमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर -
विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर 'बेटी बचाव'चं बघा - शिवसेना
मुंबई - विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर, अलिगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पाहायला हवे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचे कान टोचले. शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकातून अलिगड प्रकरणावरून मित्रपक्ष भाजपवर सेनेने टीका केली आहे. यावेळी सेलिब्रिटींवरही निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर -
मुंबईत विचित्र अपघात; रिक्षा घुसली बसमध्ये, 2 ते 3 जण गंभीर
मुंबई - चेंबूरच्या अमर महाल पुलावर रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रीक्षाला डंपरने धडक दिल्याने रीक्षा खसगी बसच्या पाठीमागे घुसून हा अपघात झाला. यामध्ये 2 ते 3 लोक जखमी झाले असून, त्यांना रिक्षाच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
'बिग बॉस'च्या घरातील पहिलं एलिमीनेशन, मैथिली जावकर घरातून बाहेर
मुंबई - कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' सिझन २ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद विवादाने घर गाजवत आहेत. अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये घरात ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. नुकतंच घरातलं पहिलं एलिमीनेशन पार पडलं. वाचा सविस्तर -