ETV Bharat / state

घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग, आरोपी अटकेत

author img

By

Published : Sep 24, 2019, 12:43 PM IST

घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थींनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड (वय 20) या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहे.

आर सिटी मॉल, घाटकोपर

मुंबई - घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थींनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड (वय 20) या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग

दहिसर येथील एका शाळेतील विद्यार्थिनी 18 सप्टेंबरला घाटकोपरच्या आर सिटी मॉल मधील किडझानिया मध्ये पिकनिक साठी आल्या होत्या. दरम्यान, गेम झोनमध्ये एक कार राइडींग करता 5 मुली बसवण्यात आल्या. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी रणवीर राठोड याने तक्रारदार मुलीला बेल्ट लावण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावर स्पर्श केला. यावेळी त्या मुलीने विरोध दर्शवला असता आरोपीने येथे असेच चालते असे सांगितले. राईड संपल्यानंतर मुलींनी ही घटना आपल्या शिक्षिकेला सांगितली. यानंतर शाळा व्यवस्थापनाने किड्झानिया मॅनेजरला लिखित तक्रार दिली.

हेही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार

घटना मुलीच्या कुटूंबियांना समजल्यानंतर कुटुंबाने त्वरित शाळेत या घटनेविषयी तक्रार केली. यानंतर दुसऱ्या दिवशी पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये दोन मुलींनी व कुटुंबांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. तर पीडित विद्यार्थिनींच्या कुटुंबियांनी किडझनिया व्यवस्थापनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबांनी आपल्या मुलांना एक अविश्वास आणि सुरक्षा लक्षात घेता पाठवावे, असे त्यांनी सांगितले. कुटुंबाचा आरोप असा आहे, की किडझनिया व्यवस्थापकाला याविषयी तक्रार देऊनही त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने, पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली आहे.

हेही वाचा - मोबाईलला रेंज नसल्याने 'या' गावाचा मतदानावर बहिष्कार

आर सिटी मॉल मधील किडझानियामध्ये चित्रपटाचे प्रमोशन करिता अभिनेता शाहरुख खान यांनी या ठिकाणी बऱ्याचदा आपल्या सिनेमाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मॉलचे आकर्षण असते.

Intro:घाटकोपरच्या आर सिटी मॉल मधील किडझानियात पिकनिकला आलेल्या विद्यार्थीनीचा विनयभंग आरोपी अटकेत

घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थीनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांनी च्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड वय 20 या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहेBody:घाटकोपरच्या आर सिटी मॉल मधील किडझानियात पिकनिकला आलेल्या विद्यार्थीनीचा विनयभंग आरोपी अटकेत

घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील मुलांसाठी असलेल्या किडझनियात पिकनिकसाठी आलेल्या दोन विद्यार्थीनी सोबत एका कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांनी च्या तक्रारीनुसार रणवीर उदयसिंग राठोड वय 20 या कर्मचाऱ्यास पार्क साईड पोलिसांनी अटक केली आहे.

दहिसर येथील एका शाळेतील विद्यार्थिनी 18 सप्टेंबरला घाटकोपरच्या आर सिटी मॉल मधील किडझानिया मध्ये पिकनिक साठी आले होते. यादरम्यान गेम झोन मध्ये एक कार राइडीग करता 5 मुली बसवण्यात आल्या यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी रणवीर उदयसिंग राठोड वय 20 तक्रारदार मुलीला बेल्ट लावण्याच्या बहानयाने तिच्या शरीरावर स्पर्श केला यावेळी त्या मुलीने विरोध दर्शवला आरोपीने येथे असेच चालते म्हटले राईड संपल्यानंतर या मुलींनी ही घटना आपल्या शिक्षिकेला सांगितले यानंतर शाळा व्यवस्थापनाने किड्झानिया मॅनेजरला लिखित तक्रार देऊन बाहेर पडले.ही घटना मुलीच्या कुटूंबाना समजल्यानंतर त्वरित कुटुंबाने शाळेत या घटनेविषयी तक्रार केली यानंतर दुसऱ्या दिवशी पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये दोन मुलीनी व कुटुंबांनी पोलिक ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीनुसार रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली यावेळी पीडित विद्यार्थिनी व कुटुंबाने किडझनिया व्यवस्थापनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली कुटुंबांनी आपल्या मुलांना एक अविश्वास आणि सुरक्षा लक्षात घेताआपल्या मुलांना पाठवावे असे त्यांनी सांगितले कुटुंबाचा आरोप असा आहे की किडझनिया व्यवस्थापकाला याविषयी तक्रार देऊनही त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली आहे.

आर सिटी मॉल मधील किडझानिया मध्ये चित्रपटाचे प्रमोशन करिता अभिनेता शाहरुख खान यांनी या ठिकाणी बरेच वेळेस आपल्या सिनेमाचे प्रमोशन केले असल्याने मुलाचे आकर्षण अधिक असतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.