ETV Bharat / state

पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यात आले की उद्योग बाहेर जातात; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Amit Shah - SANJAY RAUT ON AMIT SHAH

Sanjay Raut On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यावरुन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आले की भीती वाटते. ते राज्यात आले की राज्यातील उद्योग बाहेर जातात," असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Amit Shah
खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 11:00 AM IST

Updated : Oct 1, 2024, 2:36 PM IST

मुंबई Sanjay Raut On Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक 2024 चा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे नवी मुंबईत येणार आहेत. त्यावरुन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे राज्यात आले की राज्यातील उद्योग बाहेर जातात, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अमित शाहांनी मणिपूर, काश्मीरला जावं : सध्या काश्मीरमध्ये निवडणुका सुरू आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नेहमीच दहशतवादी हल्ले होतात. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला जाऊन सुरक्षेचा आढावा घ्याव्या, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर मणिपूर गेल्या अनेक दिवसांपासून जळत आहे. तिकडंही जाऊन अमित शाह यांनी आढावा घ्या. मात्र ते सोडून गृहमंत्री अमित शाह हे निवडणुकीसाठी महाराष्ट्रात येतात. गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले की, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातात, असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

गायीला राजमातेचा दर्जा दिल्यानं टीका : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध विषयावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकारनं गायीला राजमातेचा दर्जा दिला आहे. यावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका केली. गोमातेविषयी वि दा सावरकर यांचे विचार अगोरद सरकारनं लक्षात घ्यावे. त्यानंतर गोमातेविषयी काय ते बोलावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा :

  1. शिंदे गटानं गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा-संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Sanjay Raut news today
  2. निवडणुकीपूर्वी अडकवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप; तर सोमैया म्हणाले, "ठाकरेंच्या दबावामुळं..." - Sanjay Raut Defamation Case
  3. बलात्काराच्या आरोपात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक; देवेंद्र फडणवीस एन्काऊंटर करणार का ? संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल - Sanjay Raut On Akshay Shinde

Last Updated : Oct 1, 2024, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.