मुंबई Mohit Kamboj On Uddhav Thackeray : भाजपा नेते मोहित कंबोज नेहमी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर कुठल्या ना कुठल्या कारणानं निशाणा साधत असतात. आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आठवड्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीला अनुसरून, संजय पांडे आता उद्धव ठाकरे यांचे नवीन सल्लागार असल्याचं खोचक ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्याचबरोबर "लगता है एक संजय गया, दुसरा आया" असंही त्यांनी म्हटलं आहे.
-
पांडे जी आप का हिसाब अभी तक पूरा नहीं हुआ हैं !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
जल्द हिसाब होगा , तुम्हारी पूरी गर्मी ठंडी करेंगे !
">पांडे जी आप का हिसाब अभी तक पूरा नहीं हुआ हैं !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 29, 2023
जल्द हिसाब होगा , तुम्हारी पूरी गर्मी ठंडी करेंगे !पांडे जी आप का हिसाब अभी तक पूरा नहीं हुआ हैं !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 29, 2023
जल्द हिसाब होगा , तुम्हारी पूरी गर्मी ठंडी करेंगे !
भेटी मागचं कारण अजूनही गुलदस्त्यात : माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार पाहिला होता. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी संजय पांडे यांना जुलै 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता. अशात संजय पांडे यांनी आठवड्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटी मागचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे नवीन सल्लागार असल्याचं ट्विट केलं आहे.
काय आहे ट्विटमध्ये? : ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी सांगितलं की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, फोन टॅपिंग प्रकरणातील आरोपी संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे नवीन सल्लागार झाले आहेत. 'लगता है एक संजय गया, दुसरा आया, असं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे पांडेजी आपका हिसाब अभी तक पूरा नही हुआ है, जल्द हिसाब होगा, या तुम्हारी पुरी गर्मी ठंडी करेंगे, असं सांगत माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही धमकीवजा इशारा दिला आहे.
हेही वाचा -
- Rhul Narvekar Delhi visit : आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना
- Maratha Reservation Update: उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेला यावे- मनोज जरांगे पाटील यांच आवाहन, नेत्यांविरोधात आंदोलकांचा संताप
- Ajit Pawar Dengue : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण-प्रफुल्ल पटेल यांची माहिती