मुंबई Mohit Kamboj On Sanjay Raut : खासदार संजय राऊत आणि भाजपा यांच्यामध्ये सध्या ट्विटर वॉर जोरात सुरू आहे. संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊ येथील कसिनो मधील फोटो ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपाकडून आदित्य ठाकरे यांचा सुद्धा एक फोटो ट्विट करत त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्याकडे अजून २७ फोटो आणि ३ व्हिडिओ असल्याचं सांगितलं आहे. तसंच मला जास्त बोलायला लावू नका नाहीतर ते फोटो सुद्धा उघड करेन असं त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या आव्हानाला भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी प्रति आव्हान देत त्यांनी एक तरी फोटो किंवा व्हिडिओ ट्विट करावा असं सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे पोपट मिया सलीम अर्थात संजय राऊत हे आव्हान करत आहेत. ते म्हणतात की, त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो आणि ३ व्हिडिओ आहेत. माझं पोपट यांना खुलं आव्हान आहे की, तुम्ही जर खरे मर्द असाल, तर एक फोटो किंवा एक व्हिडिओ टाकून दाखवावा. - मोहित कंबोज,भाजपा नेते
२ कोटीची पोकर्स खरेदी : संजय राऊत यांनी काल चीनमधील मकाऊ येथील व्हेनिस हॉटेलच्या कसिनो मधील बावनकुळे यांचा जुगार खेळतानाचा फोटो ट्विट करून त्यांनी ३ कोटी ५० लाखांची उधळपट्टी केली असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाकडून सुद्धा विविध प्रकारे संजय राऊत यांना प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. परंतु संजय राऊत इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी आज पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर आरोप करताना माझ्याकडे अजून २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत, असं सांगितलं. तसंच मकाऊमध्ये कोणी पिझ्झा, सँडविच खायला जात नाही. त्या ठिकाणी काही निसर्गरम्य वातावरण सुद्धा नाही. परंतु अशा ठिकाणी जाणे हा गुन्हा नाही. मात्र खोटं बोलून, तो मी नव्हेच, असं सांगणं हा गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच गॅम्बलिंगसाठी जी करन्सी लागते त्याला पोकर्स म्हणतात. बावनकुळे यांच्यासोबत अजूनही काही लोक होते त्यांनी दोन कोचीचे पोकर्स खरेदी केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी आव्हान स्वीकारावे : संजय राऊत हे आपल्या वक्तव्यावर ठाम असून मकाऊमध्ये कसिनोमधील संपूर्ण माहिती त्यांच्याकडे असल्याचं ते वारंवार उल्लेख करत आहेत. अशात आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. संजय राऊतसुद्धा ते आव्हान स्वीकारून आणखी फोटो किंवा व्हिडिओ ट्विट करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -