मुंबई - बॉलीवूडसारख्या मायानगरीत स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपडणार्या एका मॉडेल युवतीने मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरातील केनवूड सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
हेही वाचा - पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून; स्वतःही घेतला गळफास, 'हे' आहे कारण
आत्महत्या करणार्या तरुणीचे नाव पर्ल पंजाबी असून गेल्या काही वर्षांपासून ती हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी संघर्ष करत होती. मात्र कुठलेही काम मिळत नसल्यामुळे पर्ल पंजाबी ही मानसिक तणावाखाली होती. तीचे गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईसोबत सारखे भांडत होते. याच कारणास्तव तीने गुरुवारी रात्री उशिरा अंधेरी लोखंडवाला येथील केनवूड सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ही घटना लक्षात येताच इमारतीतील रहीवाश्यांनी तीला जखमी अवस्थेत जवळच्या कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - कृत्रिम साधनाने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पती विरोधात पुण्यात गुन्हा दाखल