मुंबई - सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे मोबाईल चोरी करणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीला पडकून मारल्याची घटना 25 डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. साईजाद मेहबूब खान असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी केली मारहाण -
साईजाद मेहबूब खान हा मुक्तानंद पार्क येथे मोबाईल चोरण्यासाठी गेला असता तेथे झोपलेल्या 2 जणांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला एका खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी सहा जणांविरुध्द भादंवि कलम 302,342, आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश रामनिवस पासी (24), हयात अब्दुल लतीफ अली (26), अलीमुद्दीन सजरुद्दीन शेख (24), मोतीबुर रहमान अख्तर आलम (19), मस्कर आलम फरोजुद्दीन (18), साल पिंटूकुमार कमेश्वर साह (25) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
हेही वाचा - भारतात 4 वर्षात बिबट्यांची संख्या 12 हजार 852 वर; महाराष्ट्रात किती बिबटे पाहा