मुंबई - दादर रेल्वे स्थानकातील विश्रांती गृहामध्ये प्रवाशांच्या मोबाईलची चोरी करणारा एक चोर रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गुरुवारी रात्री सीसीटीव्हीच्या अधाराने या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. देव तोतेबुवा गिरी असे त्या चोरट्याचे नाव आहे.
दादर स्थानकात गुरुवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय रतन सिंग आणि विजय भोसले हे सीसीटीव्ही द्वारे देखरेख करत होते. त्यावेळी विश्रांती गृहात झोपलेल्या एका प्रवाशाजवळ एक संशयित व्यक्ती झोपेचे नाटक करताना आढळून आला. त्याच्यावर संशय आल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी हे विजय भोसले हे घटनास्थळावर पोहोचले त्यावेळी तो संशयित व्यक्ती झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरून वाहनतळाकडे जाताना आढळून आला. त्यावेळी भोसले यांनी तत्काळ आडवून चौकशी करण्यात आली.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या चोरट्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून ६ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि प्रवाशाचे पैशाचे पाकीट हस्तगत करण्यात आले. अधिक चौकशी केली असता, त्याचे नाव देव तोतेबुवा गिरी (वय- २२वर्षे, नांदेड) असे सांगितले.
या प्रकरणी प्रवासी अमेरे रामचंद्र सारंग यांनी टिटवाला आरपीएफ कार्यालयात दादर येथे चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी दिली.