मुंबई: तक्रारदार फिजा नाझिम खान या देखील वांद्रे येथील गरीब नगर परिसरात राहत असून तिने पोलिसांनी सांगितले की, तिचे पती नाजिम इफ्तेकार खान यांचीआरोपी शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (वय 21 वर्षे) यांची मागील सहा ते सात महिन्यापासून ओळख होती. मागील एक महिन्यापूर्वी आरोपी शादाब याचा धक्का लागून नाझीमचा मोबाईल खाली पडला. त्यासाठी रिपेअरिंगचा खर्च एक हजार रुपये इतका आला होता. या खर्चाचे १००पैकी आज आरोपीने ५०० रुपये हे नाझिम याच्या पत्नीस दिले.
चाकू छातीत भोकसला: उरलेले ५०० रुपये रात्री बारापर्यंत देतो असे सांगितले. मात्र, नाजीमने आजच ५०० रुपये पाहिजे असा तगादा लावला. त्यावरून नाझीम आणि शादाब या दोघांमध्ये वाद झाला. वांद्रे रेल्वे स्टेशनचा ब्रिजच्या खाली त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी शादाबचा मोठा भाऊ शानू हा देखील नाझीम याला हाताने मारहाण करत होता. त्यानंतर ते तिथून प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून शिडी चढून जात असतानाच आरोपी शादाबने नाझीम याला खाली खेचले आणि त्याच्या हातातील चाकूने नाझिम याच्या छातीत भोसकले आणि तो चाकू त्याचा भाऊ शानु याच्याकडे दिला. या मारहाणीत नाझीम गंभीर जखमी झाला. नंतर उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेले असता त्यास दाखल पूर्व मयत घोषित केले.
आरोपीला अटक : मयताची पत्नी यांचा जबाब नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील, पोलीस हवालदार शेख, पोलीस नाईक सोनवणे, पोलीस हवलदार पवार, पोलीस नाईक वाघमारे व पोलीस शिपाई कोयंडे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना एका तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302, 324, 323, 504 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाझीमचा मृतदेह सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती निर्मल नगर पोलिसांनी दिली आहे.