मुंबई - राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याज्या महत्वाच्या खात्याच्या कारभारावर लक्ष्य ठेवण्यासह पक्षाअंतर्गत सर्व लोकांचे काम मार्गी लावण्यासाठी शॅडो कॅबिनेट(प्रतिरूप मंत्रीमंडळ) सुरू करण्यात येणार आहे. त्यांनी मनसेचे दोन नेते या कॅबिनेटवर काम करण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी नेमले जाणार आहेत. त्यानुसार या कॅबिनेटचे कामकाज चालणार आहे. कामे करण्यासाठी सरकारला भाग पाडणे, हे काम या कॅबिनेटचे असणार आहे, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या अधिवेशनावेळी दिली.
सरकारमध्ये कसे काम चालले आहे, त्याचा अभ्यास करायचा. सरकार चुकत असेल तर त्यांच्या चुका सतत जनतेसमोर आणायच्या आणि अभ्यासपूर्ण रितीने सरकारला धारेवर धरायचे, असे काम हे कॅबिनेट करणार आहे. शॅडो कॅबिनेट आणि पक्षाचे काम करणारे वेगवेगळे नेते असतील. मनसेच्या शॅडो कॅबिनेटची भीती सरकारला वाटली पाहिजे, असे काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले असल्याचे नितीन सरदेसाई म्हणाले.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व दिले जाते. तसेच तो पक्ष सरकारच्या प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर नजर ठेवतो. विरोधी पक्षाप्रमाणेच सरकारला त्यांच्या चुकावरून धारेवर धरणाऱ्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हटले जाते. कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या नेत्यांना सोडून कार्यकर्त्यामधूम कॅबिनेट मंत्र्यांची जबाबदारी दिली जाणार आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले.