ETV Bharat / state

MNS Toll Plaza Protest : टोल नाका आंदोलन भोवलं; मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह 13 जणांना अटक - मुलुंड टोल नाका

Avinash Jadhav Arrested : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक झालीय. आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोलनाक्यावर (Mulund Toll Naka) आलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकार्‍यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली.

Mns Avinash Jadhav at Toll Naka
मनसेचे नेते अविनाश जाधव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 10:55 PM IST

मुंबई : Avinash Jadhav Arrested : टोलनाक्यावरुन आक्रमक झालेल्या मनसेने सोमवारी मुलुंड, पनवेल आणि ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केलं. मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) सोमवारी सकाळपासूनच आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसैनिक सहभागी झाले होते. वाहनचालकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Video) यांचा व्हिडिओ दाखवून टोल न भरण्याची माहिती देत असताना अविनाश जाधव यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाका जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर जळालेला टायर फेकल्याप्रकरणी मनसेच्या रोशन वाडकर यांना (Roshan Wadkar) नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात : राज्यभरात सध्या टोलच्या मुद्द्यावर मनसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी राज्यातील टोलनाक्यांवर आंदोलनाचा पवित्रा अवलंबला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पत्रकार परिषद घेत टोल नाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मनसैनिक देखील आक्रमक होऊन आंदोलनात सहभागी होऊ लागले. मनसैनिकांनी मुलुंड टोल नाक्यावर उभं राहत चार चाकी वाहनं विना टोल भरता सोडली. त्यानंतर या मनसैनिकांची नवघर पोलिसांनी (Navghar Police) धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोल नाक्यावरुनही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुलुंड टोल नाक्यावर आधी मला नोटीस द्या, मग मला अटक करा, असे अविनाश जाधव वारंवार सांगत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली.

13 जणांना केली अटक : नवघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय दंड संविधान कलम 436 अन्वये गुन्हा दाखल करून मनसे कार्यकर्ता रोशन वाडकर यांना अटक करण्यात आली आहे. तर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी नवघर पोलिसांनी कारवाई करत एकूण 13 जणांना अटक केली आहे.

...तर टोलनाके जाळून टाकू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे टोल नाक्यांवर लहान वाहनांकडून पैसे घेतले जात नाही, हे जर का आमच्या पाहणीमध्ये खोटे निघाले किंवा लहान वाहनांना टोलसाठी कोणी अडवले तर टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून पनवेल, ऐरोली आणि मुलुंड टोल नाक्यावर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवत आंदोलन सुरू केलं. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, सायंकाळी मुलुंड टोल नाका (Mulund Toll Naka) जाळण्याचा प्रयत्न झाल्यानं आतापर्यंत ऐकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. MNS Toll Plaza Burn ; टोल आंदोलन चिघळलं; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी पेटवला पहिला टोलनाका
  2. Devendra Fadnavis on Toll Plaza: टोलनाक्यावरुन फडणवीस यांची तब्बल आठ वर्षापूर्वीची माहिती देऊन सारवासारव; तर राज ठाकरे पुन्हा आक्रमक
  3. MNS Toll Protest : 'टोल'वरुन मनसे आक्रमक; कार्यकर्ते असेपर्यंत गाड्या सोडल्या फुकट अन् नंतर आकारले पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.