ETV Bharat / state

Raj Thackeray on NCP Split : 'पटेल, भुजबळ, वळसे पाटील हे पाठवल्या शिवाय जाणारे नेते नाहीत' सत्ता नाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 3, 2023, 1:48 PM IST

Updated : Jul 3, 2023, 2:33 PM IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. याबाबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारचा दिवस ढवळून निघाला

Raj Thackeray on NCP Split
सत्ता नाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात उपस्थित होते. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे : आज राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ या निवास्थानी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, मी रविवारीच माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मागच्या दोन अडीच वर्षापासून जे राजकारण चालले आहे ते दिवसेंदिवस कळस वाण बनत चालले आहे. या लोकांना कुणालाही मतदारांशी काहीही घेण देण नाही. जे कोणी सुरुवातीला एखाद्या पक्षाचे कट्टर मतदार होते ते एखाद्या पक्षाचे का मतदार होते याचाच या राजकीय पक्षांना विसर पडलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी वाट्टेलती तडजोड करायची याचे सध्या महाराष्ट्रात पेव फुटलेले आहे. मला वाटते लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र दौरा देखील लवकरच सुरू : पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी पुढच्या काही दिवसात एक मेळावा घेणार आहे. या मेळाव्यात मला तुमच्याशी बोलायचे आहे. महाराष्ट्रातल्या जनतेशी बोलायचे आहे. या मेळाव्याला मी तुम्हाला सर्वांना नक्की बोलवेल. सोबतच या सर्व घडामोडी बरोबरच माझा महाराष्ट्र दौरा देखील लवकरच सुरू होणार आहे. या दौऱ्यात मी जागोजागी जाऊन लोकांच्या भेटी घेणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

बंडा मागे शरद पवारांचा हात : पत्रकारांनी राज ठाकरेंना अजित पवारांच्या या बंडा मागे शरद पवारांचा हात आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी 'या गोष्टींशी माझा काही संबंध नाही असं शरद पवार कितीही म्हणाले तरीही दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे काही स्वतःच्या मनाने तिकडे जाणारे नेते नाहीत. त्यांना पाठवण्यात आलेले आहे. अगदी उद्या त्यांची कन्या सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री जरी झाल्या तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. हा सर्व ड्रामा आहे. या सगळ्याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीने झाली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महविकास आघाडी सरकार झालं आणि आता हे. त्यामुळे राजकारणात शत्रू कोण मित्र कोण असे राहिलेले नाही. आता मी मेळावा घे त्यावेळी तुमच्याशी उरलेल्या विषयांवर सविस्तर बोलेन.

हेही वाचा :

  1. Maharashtra Politics Crisis: अजित पवार यांच्या भूमिकेवर ज्येष्ठ कार्यकर्ते आक्रमक...म्हणाले ही रावणाची भूमिका
  2. NCP Political Crisis: अजित पवारांच्या बंडाच्या निशाण्यानंतर रोहित पवार भावूक म्हणाले... राजकारणात येऊन चूक केली का?
  3. Maharashtra Political Crisis: ईडीच्या भीतीपोटी काँग्रेसचे अनेक नेते लवकरच भाजपमध्ये जातील- सुजात आंबेडकर

Last Updated : Jul 3, 2023, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.