ETV Bharat / state

दहीहंडीचे व्यासपीठ काढले, अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; संदीप देशपांडे म्हणाले... - मनसे

राज्यात दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध आहेत. मात्र, मनसे नेते अविनाश जाधव यांनी दहीहंडीसाठी व्यासपीठ बांधले. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Aug 30, 2021, 1:45 PM IST

मुंबई : ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर दहीहंडी उत्सवासाठी बांधण्यात आलेला व्यासपीठ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसे आक्रमक झाली आहे. 'दहीहंडी साजरी करण्यावरच मनसे ठाम आहे. आज एकट्या अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. पण उद्या हजारो मनसे कार्यकर्ते ठाण्यात जमतील. त्याचं काय करणार? आम्हाला पण बघायचे की मनसे कार्यकर्त्यांना कशाप्रकारे ताब्यात घेतात?', असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

संदीप देशपांडे

मनसे भूमिकेवर ठाम

यावर्षी देखील दहीहंडी वरती निर्बंध लावण्यात आलेले आहे. दहीहंडी साजरा करू नका, असे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली आहे. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली. मात्र, काल त्यांना नोटीस देण्यात आली. यानंतरही जाधव यांनी काम सुरू ठेवले. दरम्यान, आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई केली तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार यावरती मनसे नेते ठाम आहेत.

'दहीहंडी तर साजरी होणारच, आदेश राजसाहेबांचा...'

मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील दहीहंडी साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. 'आम्ही दहीहंडी साजरी करणारच असा इशारा दिलेला आहे. आदेश राजसाहेबांचा... हिंदू सण साजरे होणारच...यंदाची दहीहंडी दणक्यात उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा...चलो ठाणे' असे ट्विट खोपकर यांनी केले आहे.

सणांवरील निर्बंधांमुळे भाजप-मनसेने सरकारला घेरले

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीला हिंदू सणांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे दहिहंडीबाबत मनसेची भूमिका ठाम असल्याचे दिसत आहे. मंदिर उघडण्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. यामुळे राज्यात सरकारची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

हेही वाचा - 'मंदिरं उघडा अन्यथा तांडव होईल', भाजपचं आज राज्यभर शंखनाद आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.