ETV Bharat / state

बीकेसी कोविड सेंटर प्रकरणी मनसेचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र, कारवाईची मागणी - बिकेसी कोविड सेंटर

मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवरती मनसे नेते अखिल चित्रे यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते. मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा कारवाई आणि उत्तर देखील न आल्यामुळे चित्रे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.

अखिल चित्रे
अखिल चित्रे
author img

By

Published : May 23, 2021, 1:15 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा यांना देखील कोलमडलेली चित्र काही ठिकाणी आहे. त्यातच मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवरती मनसे नेते अखिल चित्रे यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते. मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा कारवाई आणि उत्तर देखील न आल्यामुळे चित्रे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.

mns-reminder-letter-to-cm-about-bkc-covid-center
पत्र

बिकेसी कोविड सेंटरमध्ये 90% डॉक्टर BDS, BAMS, BUMS, BHM आहेत. तर हे डॉक्टर गंभीर स्वरूपाच्या रुग्णावर उपचार कसा करणार? असा प्रश्न मनसे नेते अखिल यांनी उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित गरज लागल्यास आम्ही स्वतः नामवंत डॉक्टरांची फौज उभी करू, मात्र आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही, असा आरोप केला होता. अनेक दिवस उलटून गेले असतानाही पत्राला कोणतेही उत्तर न आल्याने त्याबरोबर ज्या ॲडमिन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काही माहिती उपलब्ध करून दिली त्यांच्यावरच कारवाई होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आतातरी या बीकेसी कोविड सेंटर वरती कारवाई करावी, यासाठी पुन्हा चित्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

बीकेसी कोविड सेंटर प्रकरणी मनसेचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र..

बीकेसी कोविड सेंटरबाबत 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. येथे सुरू असणाऱ्या समस्या या या पत्रातून अवगत करून दिल्या होत्या. या ठिकाणी फक्त एकच एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे हे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आहे अशी टीका चित्रे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्मरण पत्र लिहित असून या पत्रात चार मुख्य प्रश्न विचारला आहे.

याशिवाय त्यांनी रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला आपलं सरकार का पाठीशी घालत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी यांच्या म्हण्यानुसार कंत्राटदाराला कॅबिनेट मंत्र्याचा आश्रय आहे, ही बाब खरी आहे का? आणि बिकेसी कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत तरूणाने डॉक्टर्स उपलब्ध नसल्याची माहिती समोर आणली, तर त्या तरुणांनाच आता सूडबुध्दीने लक्ष्य का केलं जात आहे? असा सवालही या पत्रातून विचारला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.