ETV Bharat / state

मनसेच्या बैठकीत 9 फेब्रुवारीच्या मोर्चाची चर्चा.. शॅडो कॅबिनेटची घोषणाही लवकरच

या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मोर्चाचा मार्ग ठरवला जात असून, मोर्चाची समाप्ती आझाद मैदान येथेच होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

MNS meeting: Discussion of the march on February 9
मनसे नेते बाळा नांदगावकर
author img

By

Published : Jan 27, 2020, 4:42 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आज मुंबईतल्या रंगशारदामध्ये पार पडली. यामध्ये येत्या ९ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयी चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती दिली.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मोर्चाचा मार्ग ठरवला जात असून, मोर्चाची समाप्ती आझाद मैदान येथेच होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

मनसेच्या बैठकीत 9 फेब्रुवारीला निघणाऱ्या मोर्चाची चर्चा
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
सोशल मीडियावर आणि काही बॅनरवर राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधले गेले आहे. मात्र, मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सर्वप्रथम या आशयाचे फलक ठाण्यात लावले होते. या फलकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात भूमिका होती, अशी आठवण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Intro:
मुंबई - बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवा या मागणीसाठी मनसेकडून येत्या 9
फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीची चर्चा आजच्या रंगशारदा येथील बैठकीत पार पडल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
Body:पोलिसांकडे या मोर्च्यासाठी परवानगी मागितली आहे. मोर्चा चा मार्ग ठरवला जात असून मोर्चाची समाप्ती आझाद मैदान येथेच होईल असे नांदगावकर म्हणाले.
सोशल मीडियावर काही बॅनर वर राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधले. मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.