मुंबई - राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन पलटी मारली. यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. या मुद्यावरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी टाकली आहे. मनसेने आता मात्र संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारला इशाराच दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वीज बिल मुद्यावरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. 'वीज बिलासंदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते, अशा शब्दात देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
-
वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020
काय आहे प्रकरण?
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मागील महिन्यात दिवाळीपर्यंत वाढीव वीज देयकातून सवलत मिळेल, असे सांगितले होते. हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेत आला. मात्र, अर्थ विभागाने सरसकट सर्व कंपन्यांच्या ग्राहकांना वीज देयकात सवलत देण्यास हरकत घेतली. यामुळे नितीन राऊत यांनी वीज देयकात सवलत शक्य नाही, असे स्पष्ट केले. वीज वापराप्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा - भाजप येणार, मुंबई घडवणार’: मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज
हेही वाचा - विधानपरिषद : राज्यपाल नियुक्त सदस्यांचा वाद उच्च न्यायालयात