ETV Bharat / state

कोहिनूर सिटीएनल प्रकरण : नितीन सरदेसाई ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

कोहिनूर सिटीएनल प्रकरणात मनसे नेते नितीन सरदेसाई चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांची चौकशी केली होती.

मनसे नेते नितीन सरदेसाई
author img

By

Published : Sep 5, 2019, 1:14 PM IST

Updated : Sep 5, 2019, 3:17 PM IST

मुंबई - कोहिनूर सिटीएनल प्रकरणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सरदेसाई गुरुवारी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी

ईडीने यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी राजन शिरोडकर यांची चौकशी केली. त्यानंतर कोहिनूर सिटीएनएल प्रकरणात तपासण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये आणखी काही गोष्टींचा तपास करण्यासाठी सरदेसाई यांनी ईडी कार्यालयात बोलावले असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे कोहिनूर सिटीएनएल प्रकरण -
बुडीत निघालेली 'आयएल अँड एफएस' कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. आयएल अँण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. मात्र, कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएल अँण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सला उभे करण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अँण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे? याची चौकशी सध्या ईडी करत आहे. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अँण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अँण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Intro:कोहिनूर सिटीएनल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे , उन्मेष जोशी राजन शिरोडकर यांची चौकशी झाल्यानंतर गुरुवारी ईडी ने या संदर्भात मनसे नेते नितीन सरदेसाई यांना सुद्धा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये मनसे नेते नितीन सरदेसाई हे चौकशी करिता दाखल झाले असून कोहिनूर सिटीएनएल च्या संदर्भात जी काही कागदपत्र तपासण्यात आली होती, त्यामध्ये आणखीन काही गोष्टींचा तपास करण्यासाठी नितीन सरदेसाई यांना ईडी कार्यालयात बोलावले असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे.

Body:.

Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.