ETV Bharat / state

मनसेने दिली हाथरस घटनेतील आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी - MNS division president Yashwant Killedar

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. आज चैत्यभूमी परिसरात हाथरस घटनेतील आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन मनसेने निषेध व्यक्त केला.

MNS's 'death penalty' movement
मनसेचे 'फाशीची शिक्षा' आंदोलन
author img

By

Published : Oct 5, 2020, 2:31 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. आज चैत्यभूमी परिसरात हाथरस घटनेतील आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन मनसेने निषेध व्यक्त केला.

पीडितेला लवकर न्याय मिळावा, या मागणीसाठी आरोपींचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून मनसेनेकडून 'फाशीची शिक्षा' आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हाथरस महिला अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. अशा घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली. इतकी मोठी घटना घडूनही उत्तर प्रदेश मधील भाजपा नेते गप्प आहेत. अशा घटनांना जरब बसण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा आरोपींचे हात-पाय कापले पाहिजे. भर रस्त्यात त्यांना फाशी दिली पाहिजे, असे मनसे महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.