ETV Bharat / state

MNS on Manoj Jarange Patil : 'गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी... महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये', मनसेची भावनिक साद - मराठा आंदोलन

MNS on Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation Issue) मिळावं यासाठी मराठा आंदोलक (Maratha Protest) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दुसऱ्यांदा आमरण उपोषणाचं (Jarange Patil hunger strike) हत्यार उपसलयं. या सर्व परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठा आंदोलकांना भावनिक साद घातलीय. मनसेच्या 'मनसे अधिकृत' या ट्विटर पेजवरून 'गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी... महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये' असे आवाहन करण्यात आलं आहे.

MNS Emotional Response
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 9:34 PM IST

मुंबई MNS on Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हिंसाचार उसळताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची आंदोलकांनी तोडफोड केली आणि नंतर घर पेटवून दिलं. (Raj Thackeray video on Maratha Protest) तर, दुसरीकडे मागील पाच दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललीय. एका बाजूला आंदोलन उग्र स्वरूप घेतंय तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. अशात मनसेने मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालत भावनिक (MNS Emotional Response to Maratha community) साद घातलीय.

मनसेच्या पेजवरून 'हे' आवाहन: मनसेचं अधिकृत सोशल मीडिया हँडल 'मनसे अधिकृत' या पेजवरून राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाला भावनिक साद घालण्यात आलीय. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी... मोहीम फत्ते होईस्तर झुंजत राहू या... पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये!' याला मनसेने राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ जोडला आहे.

'त्या' भाषणाचा जुना व्हिडिओ पुन्हा पोस्ट": ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या उपोषणावर लाठीचार्ज आणि गोळीबार केला होता. या प्रकारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उठली. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती. या भेटीत मराठी मराठा समाजाला संबोधित करताना राज ठाकरेंनी 'सर्वपक्षीय नेत्यांना मराठवाड्यात बंदी घाला. रस्ता रोको करा. पण, आरक्षण मिळवण्यासाठी या योद्ध्याचा जीव महत्त्वाचा आहे. तो टिकला पाहिजे, असं आवाहन देखील यांनी केलं होतं. त्यांच्या याच भाषणाचा व्हिडिओ आता मनसेकडून पुन्हा पोस्ट करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाला मनसेकडून भावनिक साथ घालण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. rakash Ambedkar Support Manoj Jarange : सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी...; प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा
  2. Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनात राडा! आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं
  3. Maratha Protest : आमदार प्रकाश सोळंकेंचं घर जाळल्यानंतर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, एकेरी उल्लेख करत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.