मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे नुकत्याच विभाग अध्यक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा अहवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करण्यात आला. त्यानंतर मनसे निवडक 100 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती
मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक, मराठवाडा, परभणी येथील जागांची चाचपणी याआधीच राज ठाकरे यांनी केली होती. कल्याण डोंबिवली या मतदारसंघात मनसेचे इच्छुक उमेदवार अधिक आहेत. तसेच या भागात मनसेचे वर्चस्व आहे. मात्र, नेमक्या किती जागा कुठे लढवणार याची अधिकृत घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची शक्यता आहे. मनसे आघाडीसोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी दाट शक्यता मनसेच्या सूत्रांनी व्यक्त केली.
हेही वाचा - आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ, म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबा देत भाजपविरोधी तोफ डागली होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना पाहायला मिळेल.