ETV Bharat / state

'कोरोना  आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभार; मनसेचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन - agitation in k east ward mumbai

खासगी रुग्णालयात नॉन-कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यामुळे अनेकांना या लॉकडाऊनमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अंधेरीत कोविड रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालय आहे. तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने इतर रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होत नाही. अंधेरी पूर्वेत कुठे आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहेत, याची कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप मनसेचे पदाधिकारी रोहन सावंत यांनी केला आहे.

agitation by mns in mumbai
मनसेचे सदस्य ठिय्या आंदोलन करताना
author img

By

Published : May 28, 2020, 2:18 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्यामुळे नॉन-कोविड रुग्णांचा देखील मृत्यू होत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पालिकेचा के पूर्व आरोग्य विभाग ढासळलेला आहे. आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतात. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवारी) अंधेरीच्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी के पूर्व पालिका विभागाबाहेर निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले.

'कोरोना'त आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभार; मनसेचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

खासगी रुग्णालयात नॉन-कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यामुळे अनेकांना या लॉकडाऊनमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अंधेरीत कोविड रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालय आहे. तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने इतर रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होत नाही. अंधेरी पूर्वेत कुठे आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहेत, याची कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप मनसेचे पदाधिकारी रोहन सावंत यांनी केला आहे. तर काही वेळातच अंधेरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार

काय आहेत मागण्या?

  • के पूर्व वैद्यकीय विभागातील कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर, ईमेल आयडी, नाव, पद कोविड सेंटर बाहेर लावण्यात यावे.
  • सेव्हन हिल रुग्णालयात उपलब्ध बेड, भरती केलेले रुग्ण, डिस्चार्ज रुग्ण यांची माहिती उपलब्ध करण्यात यावी.
  • वॉर्डमध्ये कोविड 19 रुग्णांना मोफत उपचार देणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांची यादी तपशीलवार दाखल करावी.
  • नॉन-कोविड रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न देणाऱ्या रुग्णालय दवाखान्यावर महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात यावी.
  • कोविड रुग्ण सापडलेल्या वस्तीतील सार्वजनिक शौचालयाचे निर्जंतुकीकरण करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.