ETV Bharat / state

MLC Result 2022 : काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव, भाई जगताप म्हणाले...

काँग्रेसचे नेते चंद्रकांत हांडोरे यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीतला पराभव हा धक्कादायक असल्याचे मत काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे. आपण या निवडणुकीत विजयी झालो असला तरी, चंद्रकांत हंडोरे यांच्या पराजयाचे दुःख आपल्याला अधिक झाल्याचे विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाई जगताप म्हणाले आहेत.

अशोक जगताप
अशोक जगताप
author img

By

Published : Jun 21, 2022, 6:27 AM IST

मुंबई - काँग्रेसचे नेते चंद्रकांत हांडोरे यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीतला पराभव हा धक्कादायक असल्याचे मत काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे. आपण या निवडणुकीत विजयी झालो असला तरी, चंद्रकांत हंडोरे यांच्या पराजयाचे दुःख आपल्याला अधिक झाल्याचे विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाई जगताप म्हणाले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची पडताळणी करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रत्येक पक्षाची स्वतःची मतं फुटली - राज्यसभा निवडणुकीमध्ये पराभवाचे खापर अपक्ष आमदारांच्या मत फुटीवर फोडण्यात आले. ते काही अंशी बरोबर असले तरी, विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची मतं फुटली आहेत. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. काँग्रेसची ही काही मतं या निवडणुकीत फुटली. मात्र, या सर्व बाबीचा विचार केला जाईल. राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या गोष्टी ज्याप्रमाणे नंतर उघड झाल्या त्याच प्रमाणे विधान परिषदमध्येही फुटलेल्या मतांबाबत गोष्टी बाहेर येतील, असा इशारा भाई जगताप यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा - Sangli Family Suicide Case : सुसाइड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती; पोलिसांनी 11 जणांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.