ETV Bharat / state

Graduate Constituency Election : पदवीधर मतदार संघ निवडणूक; मतदान व परिक्षा एकाच दिवशी, पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र

पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होणार आहे. मात्र, याच दिवशी राज्यत वेगवेगळ्या विभागातील परीक्षा देखील होणार आहेत. या परीक्षेला जवळपास दहा हजार विद्यार्थी बसणार असल्याने 30 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत ते विद्यार्थी मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळे या समस्येतून निवडणूक आयोगाने तोडगा काढावा, असे पत्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jan 15, 2023, 8:10 PM IST

मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्जांवरून महाविकास आघाडीत धूसफूस पाहायला मिळाल्यानंतर आता अजून एक माहिती समोर आली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी राज्यातील वेगवेगळ्या विभागातील परिक्षा देखील असणार आहेत. यामुळे भाजप आमदार यांनी यावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र : पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होणार आहेत. मात्र, याच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा देखील असल्याने याचा फटका निवडणुकांवर बसणार आहे. एकाच दिवशी पदवीधर मतदार संघातील निवडणूक आणि परीक्षा असल्यामुळे याचा फटका जवळपास दहा हजार पदवीधर मतदार यांना होणार असल्याची भीती विधानपरिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या पेचावर निवडणूक आयोगाने मार्ग काढावा, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मतदानाच्याच दिवशी परिक्षा : लोकशाही प्रक्रियेत निवडणुका या सर्वात महत्त्वाच्या असतात. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क हा बजावला केला पाहिजे. मात्र एकाच दिवशी पदवीधर मतदार संघात आलेल्या निवडणुका आणि परीक्षा यामुळे पदवीधर मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे या गंभीर मुद्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालावे, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ३० जानेवारीला नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

10 हजार पदवीधर सहभागी : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी या सर्व विभागाच्या परीक्षा होणार आहेत. दोन सत्रात या परीक्षा पार पडणार आहेत. या परीक्षेत जवळपास 10 हजार पदवीधर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे याच दिवशी होणाऱ्या पदवीधर मतदार संघातील निवणुकांच्या मतदानाला परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असल्याचे आपल्या पत्रातून पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच या मतदानाच्या आधारावर पदवीधर मतदार संघातून आमदार निवडून येतात. जे पदवीधर मतदारांच्या आणि समाजासाठी काम करतात.

33 उमेदवार रिंगणात : मात्र 10 हजार मतदार मतदानापासून वंचित राहिल्यास यामुळे चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे या गंभीर मुद्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालावे अशी विनंती पडळकर यांनी आपल्या पत्रातून केली आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. तर अमरावती मतदार संघात 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा : MLA Sudhir Tambe Suspension : आमदार सुधीर तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.