मुंबई - राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज (8 जून) पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा तोंडी लावण्यापूरता होता. राज्य सरकार राज्यातील मराठा समाजाची फक्त दिशा भूल करत आहे, अशी स्वरुपाची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
आमदार मेटे म्हणाले, ही भेट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर असल्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिष्ठमंडळ चर्चा झाली असती तर काही तरी पदरी पडलं असतं. या भेटीत मराठा समाजाच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन करतच राहणार असल्याचे आमदार मेटे म्हणाले.
...तर आपले स्वागतच
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे अनेक तरुण आहेत. प्रत्येक जण आंदोलन करत आहे. जर आपल्याला न्याय मिळत असेल तर आपले स्वागतच आहे, असे वक्तव्य आमदार विनायक मेटेंनी केले आहे.
हेही वाचा - आर्थर रोड कारागृहात कैद्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल