मुंबई : सप्टेंबरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाने बाजू बाजूला उभारलेल्या मंचावरून मंच आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये जुंपली होती. शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर यावेळी अपशब्द वापरले. दोन्ही गटाकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. मध्यरात्रीत शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाला. दादर पोलिसांत दोन्ही गटातील अनेकांविरोधात गुन्हा दाखल केले. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. मात्र हे आरोप सरवणकरांनी फेटाळले होते.
सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळीबार पोलिसांनी घटनास्थळावरून यानंतर काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासणीसाठी बॅलेस्टिक तज्ज्ञांकडे पाठवले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाला असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळते आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्याच बंदुकीतून हा गोळीबार झाल्याचे समोर आल्याने सरवणकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
काय घडले होते त्या दिवशी? गोळीबार (Sada Saravankar firing case) केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपास संपेपर्यंत सरवणकर यांची बंदूक ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली होती. प्रभादेवी परिसरात १२ ते १२. ३० च्या सुमारास दोन गटात मारामारी झाली होती. त्यानंतर गुन्हा रात्री दाखल केला होता. दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरु आहे. आर्म्स ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात १० ते २० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली होती. सदा सरवणकर यांनी जमिनीवर गोळीबार केला असून त्यांच्यासह सहा जणांवर दादर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होताअटक केलेल्या पाच शिवसैनिकांची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली आहे.
राजकीय वादळ निर्माण झाले होते शिवसैनिकांनी दादरमध्ये समाधान आणि सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले असून त्यावर दगड देखील मारले आहेत. भादंवि कलम ३९५ हटवल्याने पाच शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ आणि २५ अन्वये सदा सरवणकर यांच्यासह सहाजणांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले होते.