मुंबई - दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई 90 टक्के झाली, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरू झाला आहे, तरी अद्यापही मोठ्या नाल्याची सफाई झालेली नाही. त्याचबरोबर रस्त्यालगतचे बंद नाले साफ करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही. परिणामी यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात मुंबई जलमय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. मुंबईचे नाले डम्पिंग ग्राउंड झाले आहेत, असा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.
नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप - राम कदमांचा पालिकेवर आरोप
वरुणराजाचे आगमन होण्यापूर्वी नालेसफाईचे काम सुरू केल्याचे दावा दरवर्षी प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र, पहिल्याच पावसात पालिका प्रशासनाचा दावा वाहून जातो. यंदाही मोठ्या नाल्याची सफाई झाली नसून नाल्यातील गाळ आजही नाल्यातच आहे. त्यामुळे नाल्यात मोठया प्रमाणात कचऱ्याचे थर दिसत आहेत, जणू डम्पिंग ग्राउंड झाले आहेत, असा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.
नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप
मुंबई - दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई 90 टक्के झाली, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरू झाला आहे, तरी अद्यापही मोठ्या नाल्याची सफाई झालेली नाही. त्याचबरोबर रस्त्यालगतचे बंद नाले साफ करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही. परिणामी यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात मुंबई जलमय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. मुंबईचे नाले डम्पिंग ग्राउंड झाले आहेत, असा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.
Last Updated : Jun 4, 2020, 3:54 PM IST