ETV Bharat / state

Pravin Darekar On BJP : 2024 ला पुन्हा एकदा देशात...; प्रवीण दरेकरांना विश्वास - BJP will come to power

2024 ला पुन्हा एकदा देशात भाजपाची सत्ता (Once again in 2024 BJP rule in the country) येणार असा दावा भाजपा आमदार प्रविण दरेकर (BJP MLA Praveen Darekar) यांनी व्यक्त केला आहे. या देशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) नावाचा तेजस्वी सूर्य पुन्हा उगवणार असून भाजपा देशात सत्ता स्थापण करेल असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

Praveen Darekar On BJP
Praveen Darekar On BJP
author img

By

Published : Aug 12, 2023, 9:04 PM IST

प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : 2024 मध्ये देशात कोणाची सत्ता (Once again in 2024 BJP rule in the country) येणार यावरून आतापासूनच सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. 2014 पासून सलग 9 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपा 2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा पूर्ण विश्वास आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार स्थापन करेल असा ठाम विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर (BJP MLA Praveen Darekar) यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. आमदार दरेकर आज मुंबईत बोलत होते.

मोदी नावाचा तेजस्वी सूर्य : याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, मोदींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. ते या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच 2024 रोजी पुन्हा एकदा सूर्य उगवणार आहे. टीकाकरांना फक्त टीकाच करायची आहे. आमच्या पक्षात आल्याने कोणी स्वच्छ झाले, कुणाला क्लीन चीट दिली असे म्हणायचे काही कारण नाही. कारण ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. म्हणून आमच्यावर कितीही आरोप झाले, तरीसुद्धा आम्ही आमचे काम करतच आहोत. जनतेचा पूर्ण विश्वास आमच्यावर आहे. मागील सतत दोन टर्म अशाच पद्धतीची वक्तव्य, आरोप आमच्यावर होत होते. परंतु तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदी नावाचा सूर्य उगवला. यावर्षीसुद्धा 2024 च्या निवडणुकीत या देशावर नरेंद्र मोदी नावाचा तेजस्वी सूर्य पुन्हा उगवणार, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी केवल बाता मारण्यापेक्षा : आज पुण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. यावरून अनेक तर्कवितर्क लगावले जात असून मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री कुठल्याही पद्धतीने नाराज नाहीत. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यात योग्य तो समन्वय आहे. मुख्यमंत्री गावी गेले आहेत. मुख्यमंत्री पदावरून आमच्यामध्ये काही विषय नाही. अजित पवार यांनीसुद्धा मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट भूमिका सांगितली आहे. म्हणून विरोधकांनी बाता मारण्यापेक्षा जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

अहंकारातून काय घडलं ते : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विषयी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, संजय राऊत यांना आता सवय झाली आहे. त्यांना जे काही बोलायचे आहे, ते त्यांना बोलू द्या. त्यांच्या बोलण्यातून अहंकार, चिडचिड गोष्टी दिसत आहेत. कारण अहंकारातून काय घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. चिडचिडेपणा हा बोलण्यातून त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला सर्वसमावेक्षक असे आहे. जगात भारताचे नाव उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा विरोधकांना काही अधिकार नसल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Ajit Pawar Meeting : शरद पवार-अजित पवार यांच्यात गुप्त बैठक? राजकीय चर्चांना उधाण
  2. Sanjay Raut On BJP : तुरुंगाच्या वाटेवर असणाऱ्यांना भाजपाने मंत्री केले; संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. Ajit Pawar Reply Sanjay Raut : खुर्ची एक असेल तर दोघांनी...; अजित पवारांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.