ETV Bharat / state

2014 विधानसभा निवडणूक: "काठावर पास" आमदार - आमदार नारायण पाटील

2014च्या विधानसभा निवडणुका आघाडी आणि युती शिवाय पार पडल्या. या निवडणुाकांत राज्यातील सर्वच प्रमुख  पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. या महासंग्रामात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह भाजपच्या उमेदवारांचा कस लागला. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काही उमेदवार या लढाईतही भरगच्च मतांनी निवडून येत आपला जनाधार दाखऊन देऊ शकले तर, काही अगदी काठावर पास झाल्याचे पहायला मीळाले.

2014 विधानसभा निवडणूक: "काठावर पास" आमदार
author img

By

Published : Sep 22, 2019, 7:18 PM IST

Updated : Sep 22, 2019, 7:24 PM IST

मुंबई- 2014च्या विधानसभा निवडणुका आघाडी आणि युती शिवाय पार पडल्या. या निवडणुकांत राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. या महासंग्रामात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह भाजपच्या उमेदवारांचा कस लागला. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काही उमेदवार या लढाईतही भरगच्च मतांनी निवडून येत आपला जनाधार दाखऊन देऊ शकले तर, काही अगदी काठावर पास झाल्याचे पहायला मिळाले. तर, काही दिग्गजांना मतदारांनी घरी बसवले.

भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?

सर्वात कमी मतांनी निवडून येण्याचा विक्रम नुकतेच शिवसेनेत गेलेले श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांच्या नावावर आहे. ते अवघ्या 77 मतांनी निवडून आले होते. अवधूत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आहेत.

दुसरा क्रमांक लागतो तो करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा. त्यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा अवघ्या 257 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. बागल यांनी पाटलांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली होती.

हेही वाचा - भाजपच्या ‘दृष्टीपत्रावर' एक दृष्टीक्षेप..!

काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या जालन्याचे आमदार आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा या यादित 3रा क्रमांक लागतो. त्यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 296 मतांनी पराभव केला होता. गोरंट्याल हे खोतकरांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. युतीच्या काळात राज्यमंत्री असतानाही गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला होता.

यानंतर शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार, शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील यांचा क्रमांक लागतो. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्या विरोधात ते 388 मतांनी निवडून आले होते. हे सर्व आमदार काठावर पास झाल्याचे चित्र होते.

हेही वाचा - आमदार शिंदेंचा पत्ता होणार कट? माढ्यात राष्ट्रवादीचा नवा 'शिलेदार' कोण?

मतदारसंघ उमेदवार पक्ष मतांनी विजयी
शहादा उदयसिंह पडवी भाजप 719
धामनगाव रेल्वे वीरेंद्र जगताप काँग्रेस 974

Intro:Body:

aaaaa123.png   

close

Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.