मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा लव जिहादचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत बोलताना राज्यात १ लाख लव जिहादची प्रकरणे झाली असल्याचे सांगितले व तेव्हापासून या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी व विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधान भवनात अबू आझमी व भाजप आमदार नितेश राणे समोरासमोर आले असता या या मुद्द्यावर त्यांच्यात चांगलीच जुंपली व दोघांनी एकमेकांना आव्हान दिली आहेत.
लोढा यांच्या वक्तव्याने वाद : ८ मार्चला महिला दिनाच्या दिवशी महिला धोरणावर बोलताना महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात १ लाख लव जिहादची प्रकरण झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांसहित समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी आक्षेप घेतला व याबाबत मंत्री, मंगल प्रभात लोढा यांच्यावर विशेष अधिकार भंग दाखल करावा, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना काल केली. मंगल प्रभात लोढा यांनी चुकीची माहिती विधानसभेत दिली म्हणून राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मंगल प्रभात लोढा यांना खुल आव्हान दिले आहे. हा विषय तापलेला असतानाच आज विधानभवनात अबू आझमी व नितेश राणे समोरासमोर आले व याच मुद्द्यावर त्यांच्यात चांगलीच जुंपली.
काय म्हणाले नितेश राणे? : या मुद्द्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद होत आहेत. हिंदू मुलींना फसवून सौदीला नेऊन त्यांना तिथे विकले जाते. त्याची जबाबदारी कोण घेणार? इथे बोलणे फार सोपे असते. लग्न कोणीही कुणाबरोबर करा. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण लग्नानंतर धर्म बदलला जातो. मुलीने कुराण वाचावे. हिंदू देव देवतांचे फोटो ठेवू नयेत, असा तिच्यावर दबाव टाकला जातो. यावर आमचा आक्षेप आहे. मॅरेज ब्युरोच्या निमित्ताने लग्न केले जाते. लग्ना अगोदर असलेला आशिष शर्मा लग्नानंतर बाप झाल्यावर आमिर खान कसा बनतो? हे अगोदर त्यांनी सांगावे. लग्ना अगोदर ही मुले खोटे सांगतात, परंतु लग्न झाल्यावर ते खरे सांगतात. अबू आझमी हे ऐकतच नाहीत. त्यांना आता हे ऐकावे लागेल. त्याची सवय त्यांना करून घ्यावी लागेल. कारण हे बऱ्याच वर्षांच चिंगम आहे, इतक्या लवकर सुटणार नाही, असेही नितेश राणे म्हणाले.
उलटा चोर कोतवाल को डाटे? : अबू आझमी हे सातत्याने नितेश राणे करत असलेल्या आरोपांच खंडन करत राहिले. नितेश राणे म्हणतात म्हणून मी, दिन को रात कैसे बोलू ? असे ते म्हणाले. हिंदू मुलींबरोबर लग्न करा असे सांगणारा मुस्लिम धर्माचा एक माणूस भेटणार नाही, परंतु बेटी बचाव, बहु लाव असे सांगत मुस्लिम मुलींना घेऊन या २ लाख रुपये देणार, हा प्रकार सुरू असल्याचे म्हणाले. उलटा चोर कोतवाल को डाटे, असे नितेश राणे यांना म्हणत देशात मुस्लमानांची इमेज खराब करून देश खराब करण्याचा प्रयत्न हे करत आहेत, असे आमदार अबू आझमी म्हणाले आहेत.
नेमका काय झाला वाद? : नितेश राणे व अबू आझमी यांच्यात रंगलेली ही शाब्दिक चकमक मोठ्या प्रमाणात वाढली. याबाबत आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, मुंबईत ग्रीन झोनवर मदरसे निर्माण केले जात आहेत ते चुकीचे आहे. त्यावर अबू आझमी म्हणाले की असे काही असेल तर ते तोडायला पाहिजेत. त्यावर नितेश राणे म्हणाले की, ते कसे तोडणार तुमची लोक शस्त्र घेऊन येतात. त्यावर अबू आज मी म्हणाले की, हे खोटे आहे, असे काही असेल तर मी तुमच्यासोबत येतो. त्यावर नितेश राणे म्हणाले की, आप आज तारीख और टाइम बताओ मै आपको लेने आता हू. परंतु नितेश राणे यांच्या वक्तव्याला पूर्ण नकार देत अबू आझमी यांनी तुम्ही आक्रोश रॅली काढत आहात. त्या रॅलीतील लोकांना बोलवा मी मुस्लिम समाजाला घेऊन येतो समोरासमोर होऊन जाऊ दे, असे सांगितले आहे. त्याच बरोबर एक शायरी ही ऐकवली आहे.
हेही वाचा : Ajit Pawar on Pension Scheme : सरकारची मानसिकता असेल तर जुन्या पेन्शनवर तोडगा निघेल - अजित पवार