मुंबई - काँग्रेसकडून किती मंत्रिपदे मिळतील आणि कोणाला कोणते मंत्रिपद दिले जाईल, यासाठीचा संपूर्ण निर्णय दिल्लीत हायकमांडकडून घेतला जाणार आहे. मात्र, आमचे सर्वसमावेशक कार्यक्रमावर सर्व काही ठरले असून आम्ही राज्यात चांगल्या पद्धतीने सरकार चालवू, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला.
विधानभवन परिसरात शपथविधीला पोहचण्यापूर्वी पटोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. आम्ही राज्यात ५ वर्षे सरकार चालवू असे सांगत आमचे सर्व ठरले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार स्थापन झाल्यावर सर्वात पहिला निर्णय आम्ही राज्यातील शेतकरी आणि त्यासोबतच बेरोजगार यांच्या दृष्टीने घेणार आहोत. राज्यातील असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आम्हाला काम करायचे आहे, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा - मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार - अजित पवार
आज (बुधवार) होत असलेल्या आमदार शपथविधी कार्यक्रमासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, आजचा हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मागील महिनाभरापासून राज्यात भाजपने ज्याप्रकारे राष्ट्रपती राजवट लागू करून जो गोंधळ निर्माण केला होता. त्यानंतर आता राज्यात लोकांनी निवडलेले सरकार स्थापन होत आहे. त्यात आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार बनवत असून राज्यात एक अत्यंत चांगले सरकार येत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - आगे आगे देखो होता है क्या - सुप्रिया सुळे