ETV Bharat / state

The Policy Of Women and Child: महिला बाल विकास विभागाला चौथे धोरण सादर करण्याचे मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश - राज्यातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण

राज्यातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे त्यांना विकासासाठी संधीची समानता उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज गुरुवार (दि. ३ नोव्हेंबर)रोजी विभागाचे आयुक्त आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन राज्यासाठी चौथे महिला धोरण मसुदा सर्वसमावेशक बनवून वेळेस सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Nov 3, 2022, 8:27 PM IST

मुंबई - राज्यातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे त्यांना विकासासाठी संधीची समानता उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विभागाचे आयुक्त आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन राज्यासाठी चौथे महिला धोरण मसुदा सर्वसमावेशक बनवून वेळेस सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिलांना विकासात समान संधी - महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की," आपल्या राज्यातील महिलांना संधीची समानता उपलब्ध करून दिली पाहिजे, महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्या दृष्टीने चौथ्या धोरणासाठी सर्व अधिकारी मंडळींनी त्वर्याने सर्वसमावेशक चौथे महिला धोरण मसुदा तयार करावा." राज्याची लोकसंख्या 12 कोटी 49 लाख 4 हजार इतकी आहे. यामध्ये निम्म्या संख्येने महिला आहेत म्हणजेच सहा कोटी 47 लाख 50 हजार इतकी अंदाजीत महिलांची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. यामध्ये विविध वयोगटाच्या महिला आहे. या सर्व महिलांना विकासात समान संधीचा अवसर मिळावा यासाठीचे चौथे महिला धोरणाचा मसुदा शासनाने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

चौथे महिला धोरण मसुदा - महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतिशील आहे यात दुमत नाही. फुले शाहू आंबेडकर या तीनही महामानवांच्या कार्य आणि व्यवहारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणात स्थान आहे. महिलांची प्रगती आणि महिलांची विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी आपल्याला पाहायला मिळते. याला कारण राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जे शिक्षणामध्ये क्रांतिकारी निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्य केले त्यामुळेच. महाराष्ट्र शासनाचा राज्याच्या महिलांच्या विकासासाठी चौथे महिला धोरण मसुदा तयार करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.