ETV Bharat / state

Mumbai Fire Accident News: दादरमधील ४२ व्या मजल्यावर आग, आमदार कालिदास कोळंबकर यांनी बीएमसीलाच ठरविले जबाबदार - Mumbai Dadar Fire

दादर पूर्व भागामध्ये असलेल्या आरए रेसिडेन्सी टॉवरला काल रात्री ८ वाजनाच्या सुमारास आग लागली होती. बघता बघता २ लेव्हलची आग आज लेव्हल 4 पर्यंत गेली होती. ही आग आता आटोक्यात आली असली तरी या आगीवरून राजकारण तापलं आहे. मुंबई महानगर पालिकेचा निष्काळजीपणा यासाठी जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.

MLA Kalidas Kolambakar
आमदार कालिदास कोळंबकर
author img

By

Published : Jan 27, 2023, 11:23 AM IST

मुंबई : दादर पूर्व येथील आरए रेसिडेन्सी टॉवरच्या ४२ व्या मजल्यावर काल रात्री आठच्या सुमारास आग लागली. सुरूवातीला लेव्हल दोनची असलेली आग थोड्याच अवधीत लेव्हल चारपर्यंत पोहचली. यावेळी स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली गेली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची घटना घडल्यामुळे टॉवर खाली करण्याचे काम सुरू झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्ध पातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु ४२ व्या मजल्यावर आग लागली असल्या कारणामुळे त्यांना तितपर्यंत पाणी नेण्यात अपयश येत होते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीत असलेली फायर फाईलट सिस्टीम बंद असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार ठरवले आहे.

महापालिका जबाबदार : या आगीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेले भाजपचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले की, आग ४२ व्या मजल्यावर लागली असल्या कारणामुळे त्यावर नियंत्रण आण्यासाठी वेळ लागत आहे. मुंबई महानगर पालिकेने इतक्या मोठ्या इमारतींना बांधकामासाठी परवानगी देताना सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. या इमारती मधील फायर फाईट सिस्टीम काम करत नसल्याचे दिसते आहे. तसेच बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीची फायर फायटिंग़ सिस्टिम निष्क्रिय ठरली आहे. यासाठी महापालिका जबाबदार आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचेही कोळंबकर यांनी सांगितले. कालिदास कोळंबकर यांनी या आगी संदर्भात मुंबई महानगर पालिकेला जबाबदार ठरवल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे.

इमारतीची लिफ्टही बंद होती : टॉवरच्या 42 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रात्री 8.30 च्या सुमारास आग लागली होती. दारावरची बेल वाजल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागला, कारण लिफ्ट बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला. मात्र या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असती तर आग पसरली नसती आणि लवकर आटोक्यात आणता आली असती, असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Fire at apartment in Thane इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला भीषण आग आजी आणि नातीचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.