मुंबई : हर हर महादेव चित्रपटामध्ये अनैतिहासिक प्रसंग ( Unhistorical events in the movie Har Har Mahadev ) आणि पात्र घुसवले गेल्याच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले. याबाबत छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी देखील आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awad ) यांनी प्रत्यक्ष चित्रपट बंद पाडत त्यावेळी, अनैतिहासिक बाबी चित्रपटात घुसवल्या असे म्हणत ठाण्यामध्ये विवियाना मॉल येथे चित्रपट बंद पाडला. आता बाजीप्रभू देशपांडे यांचे पुढील पिढीने देखील या चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. तशी कायदेशीर नोटीस चित्रपट निर्मात्यांना पाठवली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी खोचक ट्विट करत चित्रपट समर्थकांना केलेले आहे. आता चित्रपट समर्थकांचे डोळे उघडतील का ? असा प्रश्न त्यांनी थेट विचारला. त्यांच्या या ट्विटला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय उत्तर देते (Maharashtra Navnirman Senas reply to tweet ) हे पाहणे उत्सुकतेच आहे.
-
आता तरी त्याचे समर्थन करणा-यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आता तरी त्याचे समर्थन करणा-यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 16, 2022आता तरी त्याचे समर्थन करणा-यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 16, 2022
हरहर महादेव चित्रपटाला विरोध : ठाण्यामध्ये चित्रपट बंद पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत प्रेक्षकांनी गुन्हा नोंदवला होता. त्यांना अटकही झाली. त्यानंतर जामीनही मिळाला. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी हरहर महादेव चित्रपटाला विरोध होऊ लागला. राज्यातील अनेक जिल्ह्यात हा चित्रपट संभाजी ब्रिगेड संघटना आणि इतर संघटनांनी बंद पाडला.
पत्रकार परिषद घेऊन आक्षेप : या वादाच्या पार्श्वभूमीवर बाजी प्रभू यांचे वारस त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतला आहे. हिरडस मावळ येथील शिंदे या गावात बाजीप्रभू राहत होते . चित्रपटात दाखवलेला येथील स्त्रियांचा बाजार अफजलखान भेटीप्रसंग बाजीप्रभूंची उपस्थिती अशा गोष्टींचा ऐतिहासिक पुरावा नाही. याकडे लक्ष वेधत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो आपल्याला दाखवण्याच्या मागणीला प्रतिसाद देण्यात न आल्याची नाराजी देशपांडे यांच्या वंशजांनी नोंदवली. बाजीप्रभू देशपांडे यांचे वारस रतन विजय देशपांडे, किरण अमर देशपांडे, अमर वामनराव देशपांडे भोर येथे स्थायिक असलेल्या या वारसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हरहर महादेव संदर्भात त्यांचे जे काही आक्षेप आहे ते सार्वजनिक केले. एखाद्या काल्पनिक चित्रपटासाठी चित्रपट स्वातंत्र्य घेणे ठीक आहे, मात्र छत्रपती शिवराय आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या संदर्भात ऐतिहासिक घटनांवर आधारित ते स्वातंत्र्य चित्रपटासाठी घेणे योग्य नाही. असे देखील बाजीप्रभू देशपांडे यांच्या वारसांनी म्हटलेले आहे.
समर्थकांना जितेंद्र आव्हाड यांनी केली बोचरी टीका : ह्या नाराजी नंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात, आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का? हर हर महादेव चित्रपटाच्या समर्थकांना जितेंद्र आव्हाड यांनी बोचरी टीका प्रश्नार्थक वक्तव्यातून ट्विटरवर केल्यामुळे आता चित्रपट समर्थक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.