ETV Bharat / state

'जे सरकार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, मी त्याच्यासोबत जाईन' - राज्य सरकार

जे सरकार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, त्याच्यासोबत मी जाईन, असे वक्तव्य औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.

आमदार हर्षवर्धन जाधव
author img

By

Published : May 14, 2019, 10:43 PM IST

मुंबई - जे सरकार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, त्याच्यासोबत मी जाईन, असे वक्तव्य औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जाधव आले होते, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, सद्य स्थितीत राज्य सरकार, मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतीत गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी केली.

आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव

मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासंदर्भांत राज्य सरकार गंभीर नाही. प्रवेशासंबंधी राज्यसरकार अंतिम निर्णय घेऊ शकते. राज्य सरकार अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करू शकते, मग काढत का नाहीत. राजकीय इच्छा शक्ती कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तातडीने सरकारने याबाबत निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

जे सरकारने मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, मी लोकसभेत निवडणून आल्यावर त्याच्यासोबत जाईन. सद्य स्थितीत देशात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे अपक्ष खासदारांची गरज दोन्ही पक्षांना लागणार असल्याचे भाकितही जाधव यांनी वर्तवले आहे. देशात क्षत्रिय समाज सध्या मागे पडत आहे. त्यासाठी आरक्षण मागितलं जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी सोडवावा. तसे केल्यास निकालानंतर मी त्यांना पाठींबा देईल, असे जाधव यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले होते.

Intro:मुंबई ।
मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासंदर्भांत राज्यसरकार गंभीर नाही. प्रवेशासंबंधी राज्यसरकार अंतिम निर्णय घेऊ शकते. राज्यसरकार अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करू शकते. मग का नाही काढत आहे. राजकीय इच्छा शक्ती कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तातडीने सरकारने याबाबत निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जाधव आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
Body:लोकसभेत निवडून आल्यास मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्यालाच मी पाठिंबा देईन, असे आश्वासनदेखील जाधव यांनी दिले. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आहे, त्यामुळे अपक्ष खासदारांची गरज दोन्ही पक्षांना लागणार आहे, असेही जाधव म्हणाले.

देशात क्षत्रिय समाज सध्या मागे पडत आहे. त्यासाठी आरक्षण मागितलं जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी सोडवावा. तसे केल्यास निकालानंतर मी त्यांना पाठींबा देईल, असे जाधव यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.