ETV Bharat / state

MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी मनपा अभियंत्याच्या लगावली कानशिलात, निलंबित करण्यासाठी दिले पत्र - MLA Geeta Jain

आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना आज घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरला आहे. तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

MLA Geeta Jain
MLA Geeta Jain
author img

By

Published : Jun 20, 2023, 9:21 PM IST

Updated : Jun 20, 2023, 10:25 PM IST

आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण

मुंबई : काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. दरम्यान अशाच एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहोचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता.

अभियंत्याच्या कानशिलात लगावली : मीरा-भाईंदरमधील भाजप आमदार गीता जैन यांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. गीता जैन यांनी तरुण अभियंत्याच्या कानाखाली लगावली आहे. बेकायदा बांधकामावरील कारवाईबाबत गीता जैन आणि अभियंता यांच्यात वाद झाला. या बाचाबाचीमुळे गीता जैन यांनी अभियंत्याची कॉलर पकडून कानशिलात लगावली. गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद : मीरा-भाईंदरमधील प्रभाग समिती सहाचे अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या. यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि सोनी यांना त्यांनी चांगलेच खडसावले. परंतु त्याच वेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली लगावली. गीता जैन बोलत असाताना अभियंता शुभम पाटील हसले, त्यामुळे जैन यांनी संतापून पाटील यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. हे संपूर्ण प्रकरण अनधिकृत बांधकामांच्या वादातून घडले आहे.

गीता जैन यांना घेराव घातला : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरीच्या घटना घडल्यानंतर संतप्त महिलांनी आयोजकांवर आरोप केला. पोलिसांनी महिलांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार घेण्यास नकार दिल्याने संतप्त महिलांनी आयोजक आमदार गीता जैन यांना घेराव घातला. दरम्यान, गीता जैन आणि महिलांमध्ये वाद झाला.

अवैध डान्सबार कारवाईची मागणी : बेकायदा डान्सबार आणि लॉजिंग हॉटेल्सवर कारवाई करण्याची मागणी गीता जैन यांनी केली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील अवैध डान्सबार आणि लॉजिंग हॉटेल पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी महापालिका आयुक्तांकडे शहरातील बेकायदा डान्सबार, लॉजिंग हॉटेल्सवर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा - Gaddar Day : गद्दार दिनावरून राजकारण तापले; शिवसैनिक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

Last Updated : Jun 20, 2023, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.