मुंबई - आम्हाला आमच्या आमदारांना भेटू द्या. ते स्वतःहून आले की दबावामुळे आले हे त्यांना विचारू द्या. यासाठी आम्ही सोफिटेल हॉटेलजवळ आलो आहोत. भाजप नेत्यांना भेटू दिले जाते मग आम्हाला का नाही, असा सवाल निदर्शने करण्यासाठी आलेल्या भाई जगताप यांनी पोलिसांना उपस्थित केला.
कर्नाटक येथील राजीनामा दिलेले १० आमदार हे मुंबईतील सोफीटेल हॉटेल थांबले आहेत. या आमदारांना भेटू द्यावे यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पण पोलिसांनी त्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
आम्ही फक्त विचारणा करण्यासाठी इथे आलो आहोत. इथे गोंधळ घालण्यासाठी आम्ही आलो नाही आहे. जे भारतीय जनता पक्षाचे हे सुरू आहे ते खूप वाईट आहे, असेही जगताप यांनी सांगितले.