ETV Bharat / state

"मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना पालिकेचा मात्र अक्षम्य हलगर्जीपणा" - मुंबई कोरोना अपडेट

कांदिवली पूर्व येथील अवघ्या 32 वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्याप महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे.

mla atul bhatkhalkar
आमदार अतुल भातखळकर
author img

By

Published : Apr 25, 2020, 9:37 PM IST

मुंबई - कांदिवली पूर्व येथील अवघ्या 32 वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्याप महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे.

20 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असताना सुद्धा अद्या याच्यानंतर जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल प्रमाणे कुठलीही पावलं उचलणे तर सोडाच पण कालपर्यंत त्याच्या मृत्यूची माहिती तो राहत असलेल्या आर. साऊथ वॉर्डातल्या अधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मधून कळवली गेली नव्हती. त्यामुळे हा तरुण ज्या वस्तीत राहत होता त्याच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आलेले सर्व लोक, त्याच्या घरातले लोक आजही त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे या भागात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूचे आकडे लपवण्याकरिताच हा प्रकार केला आहे. तसेच अक्षम्य हलगर्जीपणा जाणीवपूर्वक केला गेला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी आपल्या या पत्रात केलेला आहे.

आता तरी तातडीने मृत व्यक्ती ज्या घरात ज्यांच्याबरोबर राहत होता त्यांचं टेस्टिंग करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात आपण तातडीने कार्यवाही करावी तसेच यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.