ETV Bharat / state

Violation Against Somaiya : सोमय्या, बोरीकरांविरोधात विधान परिषदेत हक्कभंग सूचना - MLA Anil Parab filed a notice

वांद्रे येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना आमदार अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बांधकाम पाडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांना अवमानाची नोटीस बजावली. त्यामुळे आमदार परब यांनी आज विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना केली.

Violation Against Somaiya
Violation Against Somaiya
author img

By

Published : Mar 10, 2023, 10:13 PM IST

मुंबई : वांद्रे येथील बेकायदा बांधकामप्रकरणी शिवसेना आमदार अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ते बांधकाम पाडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांना अवमानाची नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळेच आमदार परब यांनी आज विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना केली. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

शिवसेना कार्यालय बेकायदेशीर : वांद्रे येथील म्हाडाच्या इमारती क्रमांक ५७ आणि ५८ च्या मधोमध असलेले शिवसेनेचे कार्यालय म्हाडाने बेकायदा घोषित केले. यासंदर्भात आमदार अनिल परब यांना नोटीस देण्यात आली होती. हे कार्यालय अनिल परब यांचे असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी सातत्याने केला आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हातकड्या लावून नोटिसा बजावून माध्यमांतून बदनामी करण्यात आली. मला नोटीस देण्यापूर्वी म्हाडाने कागदपत्रे तपासायला हवी होती. मात्र तसे न करता जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, हे कार्यालय माझे नसल्याचे तपासात उघड झाले. म्हाडा प्राधिकरणानेही एका पत्रात स्पष्टीकरण दिले आहे.

बोरीकर यांच्यावर हक्कभंगाची नोटीस : माजी मंत्री असताना लोकप्रतिनिधी म्हणून जनमानसातील माझी प्रतिमा डागाळली. त्यामुळे अनिल परब यांनी किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल केली. विधानपरिषदेतील हक्कभंग समिती अद्याप गठीत झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. हक्कभंगाची चौकशी करून येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले. लवकरच विधान परिषदेतील गटनेत्यांची बैठक घेऊन हक्क गट समिती नेमण्याबाबत विचार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

विधानपरिषदेत आजवर पाच हक्कभंग : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून आजवर पाच हक्क भंग सूचना परिषदेत मांडण्यात आल्या. विधिमंडळात संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत हक्क भंग सूचना सत्ताधारी पक्षातून राम शिंदे यांनी मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहा पानाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्यांची तुलना देशद्रोही केल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा ठराव मांडला होता.

दरेकर यांनी हक्कभंग मांडला : संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोही असा उल्लेख केल्यामुळे प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग मांडला होता. आज शिवसेना आमदार अनिल परब आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पातळीवर अधिकारी वर्ग बैठकीला उपस्थित राहत नसल्याचा ठपका ठेवत, हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. या सर्व हक्कभंग सूचनांवर या अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - Lotus aims for Kerala after NE : ईशान्येतील राज्यांनंतर भाजपची केरळकडे वाटचाल, 'डाव्यांचा बालेकिल्ला' करणार का ध्वस्त..?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.