ETV Bharat / state

'महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं, की घरीच मरावं?'

मानखुर्द कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या विषयावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं की घरीच मरावं हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

minor girl  Physical abuse in quarantine center : bjp leader chitra wagh criticize mahavikas aghadi government
अल्पवयीन मुलीचा विनयभंग : 'महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं की घरीच मरावं, हे उद्धव सरकारने स्पष्ट करावे'
author img

By

Published : Sep 15, 2020, 12:53 PM IST

मुंबई - मानखुर्द कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. तसेच राज्यातील विविध भागात कोविड व क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल महिला आणि मुलींना विनयभंग, बलात्कारासारख्या गलिच्छ गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. अशात राज्य सरकारने महिला आणि मुलींनी उपचारासाठी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरला जावं की घरीचं मरावं, हे स्पष्ट करावे, असे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ बोलताना....
पुढे त्या म्हणाल्या, की राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये अनेक गलिच्छ घटना घडत आहेत. अशीच एक घटना काल (सोमवार) रात्री मानखुर्द क्वारंटाइन सेंटर घडली. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार? असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

राज्यात भीतीदायक परिस्थिती आहे. भगिनींनी संताप, शोक व्यक्त करत बसायचे आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचे. आम्ही एसओपीची मागणी मागील 4 महिन्यापासून सरकारकडे करत आहोत. पण सरकार याकडे लक्ष देत नाही. इतर घटनेत तत्परता दाखवणारे हे सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणा पुरतचे का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा - संतापजनक..! मुंबईत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.