मुंबई : आजोबांना जेवणाचा डबा दिल्यानंतर घरी परतण्यासाठी रिक्षाची वाट बघत असलेल्या, 14 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आज्ञास्थळी नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देवनार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शारीरिक अत्याचार केला : मानखुर्द परिसरात राहणारी तक्रारदार मुलगी आजी-आजोबांकडे राहते. काही दिवसांपूर्वी मुलगी नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या आजोबांना जेवणाचा डबा देऊन घराकडे निघाली. घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत असताना तिथे आलेल्या रिक्षा चालकाने, रिक्षा घराच्या दिशेने न घेता वाशी नाका येथे रिक्षा घेऊन गेला. वाशी नाका येथे उभ्या असलेल्या मुश्ताक याने मुलीला टँकर मागे नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आहे.
मुलीने घडलेला प्रकार सांगितला : भयभीत झालेल्या पीडित मुलीने घटनास्थळावरून कसाबसा पळ काढला. मुलीने भीतीपोटी याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. मात्र तिच्यातील झालेल्या बदलामुळे आजी-आजोबांनी विश्वासात घेऊन तिची कसून चौकशी केली. त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार आजी-आजोबांना सांगितला. त्यानंतर आजी-आजोबांनी आपल्या नातीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी विनयभंग पॉक्सो अंतर्गत रिक्षा चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नुकतीच घडली होती प्रवाशाकडून अश्लील वर्तणुकीची घटना : भांडूप परिसरात बेस्ट बसने प्रवास करत असताना शेजारच्या सीटवर बसलेल्या श्याम सुंदर चव्हाण याने 17 वर्षे तरुणीसोबत अश्लील चाळे केले होते. पीडित मुलीने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून शनिवारी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार भांडुप पोलीस आणि विनयभंगासह पॉक्सोचा गुन्हा नोंदवला होता. तसेच आरोपीला रविवारी पहाटे अटक केली आहे.
हेही वाचा -