ETV Bharat / state

मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या केल्या रिकाम्या; अधिकाऱ्यांचा माहिती देण्यास नकार

मंत्रालयात काल दुषित पाणी पिल्याने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाचे पडसाद विधानमंडळात उमटल्यानंतर मुंबई महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या आहेत.

author img

By

Published : Jun 22, 2019, 5:09 PM IST

मुंबई

मुंबई - मंत्रालयात काल दुषित पाणी पिल्याने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाचे पडसाद विधानमंडळात उमटल्यानंतर आज खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या आहेत. ज्या टाक्यांवर संशय घेतला जात होता, त्यातील सर्व पाणी रिकामे करून त्या स्वच्छ केल्या जात असून याविषयी पाण्याचे नमुने महापालिकेने गोळा केल्याचे सांगण्यात आले.

मुंबई

त्यासोबतच काल मंत्रालयात 'योग दिन' असल्याने मोठ्या प्रमाणात खासगी पाणी वितरक संस्थांच्या पाण्याच्या बाटल्या आणण्यात आल्या होत्या, त्या बाटल्यांवर महापालिका अधिकाऱ्यांना संशय असून त्याचेही नमुने सकाळी अनेक कार्यालयात असलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोर न बोलण्याच्या अटीवर सांगितले. आमच्या टाक्यातील पाण्याची आम्ही पूर्ण काळजी घेत असतो. मात्र, खासगी संस्थांकडून पाण्याच्या बॉटल मागवण्यात आल्या असल्याने त्यातून हा प्रकार घडला असावा, असा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मंत्रालयात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सकाळपासून असलेल्या पाण्याच्या टाक्या खाली करून त्यासाठीची स्वच्छता पुन्हा सुरू केली असून सायंकाळनंतर त्यात पुन्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीत त्या भरल्या जाणार आहेत.

Intro:मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या केल्या रिकाम्या; अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास दिला नकारBody:मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या केल्या रिकाम्या; अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास दिला नकार

(या बातमीसाठी पीटूसी आणि मंत्रालय पाणी दुषित नावाने मोजोवर काही व्हीज्वल पाठवलेले आहेत ते घ्यावेत)
मुंबई, ता. 22

मंत्रालयात काल दुषित पाणी पिल्याने अनेक अधिकारी कर्मचारी यांना झालेल्या त्रासाचे पडसात विधानमंडळात उमटल्यानंतर आज खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या आहेत. ज्या टाक्यांवर संशय घेतला जात होता त्यातील सर्व पाणी रिकामे करून त्या स्वच्छ केल्या जात असून याविषयी पाण्याचे नमुने महापालिका गोळा केल्याचे सांगण्यात आले. त्यासोबतच काल मंत्रालयात योगा दिन असल्याने मोठ्या प्रमाणात खासगी पाणी वितरक संस्थांच्या पाण्याच्या बाटल्या आण्यात आल्या होत्या, त्या बाटल्यांवर महापालिका अधिकाऱ्यांना संशय असून त्याचेही नमुने सकाळी अनेक कार्यालयात असलेल्या पाण्याच्या बॉटल्या गोळा करून घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोर न बोलण्याच्या अटीवर सांगितले. आमच्या टाक्यातील पाण्याची आम्ही पूर्ण काळजी घेत असतो. मात्र खासगी संस्थांकडून पाण्याच्या बॉटल मागवण्यात आल्या असल्याने त्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान मंत्रालयात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सकाळपासून असलेल्या पाण्याच्या टाक्या खाली करून त्यासाठीची स्वच्छता पुन्हा सुरू केली असून सायंकाळनंतर त्यात पुन्हा अधिकाऱ्यांच्या देखभालीत त्या भरल्या जाणार आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.