ETV Bharat / state

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्थिती निर्माण करणाऱ्यांनाच जनता धडा शिकवेल - मुनगंटीवार

जे लोक ताणून धरत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्थिती निर्माण करत आहेत, जनता त्यांनाच धडा शिकवेल, आम्हाला नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

sudhir mungantiwar
author img

By

Published : Nov 2, 2019, 12:18 PM IST

Updated : Nov 2, 2019, 12:26 PM IST

मुंबई - राज्यात सरकार स्थापनेसाठी सुरू असलेला घोळ कायम आहे. भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खातेवाटपावरून वाद सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या वक्तव्यावरून संजय राऊत आणि शिवसेनेकडून टीका केली जात आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देताना, सरकार स्थापनेबाबत संविधानात असलेल्या तरतुदींची माहिती दिली, राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही, असे म्हटले आहे.

जे लोक ताणून धरत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्थिती निर्माण करत आहेत, जनता त्यांनाच धडा शिकवेल, आम्हाला नाही, असेही मुनगंटीवार यांनी म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या मुद्यावर मुनगंटीवार यांच्यावर आगपाखड केली होती, यावर मुनगंटीवार यांनी हा इशारा दिला आहे. राऊत यांनी सातत्याने शिवसेनकडून मुख्यमंत्री पदाची मागणी लावून धरली आहे. त्यावर बोलताना राज्यात कोणतेही सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू व्हायची शक्यता असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले होते. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी भाजपने आम्हाला धमकी देऊ नये, असा टोला लगावला होता. या विधानानंतर महायुतीतला तणाव वाढत आहे.

सरकार स्थापनेबाबत संविधानात असलेल्या तरतुदींची केवळ माहिती दिली, राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक ताणून धरत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्थिती निर्माण करत आहेत, जनता त्यांना धडा शिकवेल, आम्हाला नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनाल गर्भित इशारा दिला. त्यामुळे सत्तेच्या वाटाघाटीवरून भाजप आणि शिवसेना महायुतीतला तणाव आता उग्र रूप धारण करत असल्याचे दिसत आहे.

Intro:Body:

[02/11, 11:51 am] Sachin gadhire: सरकार स्थापने बाबत संविधानात असलेल्या तरतुदींची माहिती दिली, राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही- मुनगंटीवार यांचे संजय राऊत यांना उत्तर....

जे लोक ताणून धरत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची स्तिथी निर्माण करत आहेत, जनता त्यांना धडा शिकवेल ,आम्हाला नाही...मुनगंटीवार

Conclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.