ETV Bharat / state

'भाजी मंडई अन् किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे' - Mumbia news

अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोडून बाकी सर्व दुकानाचा सकाळी सात ते अकरा ही वेळ देण्यात आलेली आहे. या काळात किराणा दुकाने, भाजी मंडई, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत आहे. यावेळी वेळेचे बंधन न ठेवता दिवसभर ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

रामदास आठवले
रामदास आठवले
author img

By

Published : Apr 29, 2021, 8:51 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध देखील अधिक कडक केले आहेत. त्याबरोबर दुकानाच्या वेळेत देखील बदल केली आहे. अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोडून बाकी सर्व दुकानाचा सकाळी सात ते अकरा ही वेळ देण्यात आलेली आहे. या काळात किराणा दुकाने, भाजी मंडई, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी आणि भाजी मार्केटसाठी वेळेचे बंधन न ठेवता दिवसभर ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजी बाजार अन्न धान्य किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत खुली ठेवण्याचा चुकीचा नियम राज्य सरकारने सुरू केला आहे. या वेळेच्या बंधनामुळे सकाळी या दुकानांवर भाजी बाजरात मोठी गर्दी उसळत आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजी मंडई यांना वेळेचे बंधन न ठेवता कोरोना पसरू नये याची काळजी घेत मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी सूचना आठवले यांनी केली आहे. वेळेचे बंधन न ठेवल्यास दुकानांवर भाजी बाजरात गर्दी होणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात आता 15 मेपर्यंत कडक निर्बंध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.