ETV Bharat / state

पेगासस प्रकरणी नेमलेल्या समितीला न्यायालयाने अधिकार द्यावेत - गृहराज्यमंत्री - पेगासस हेरगिरी प्रकरण

पेगासिस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती चे स्वागत आहे. मात्र, या सदस्य समितीला पूर्ण अधिकार दिले गेले पाहिजेत, केंद्राने त्याची कार्यकक्षा ठरवण्याऐवजी न्यायालयाने ठरवली तरच काहीतरी निष्पन्न होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सतेज पाटील
सतेज पाटील
author img

By

Published : Oct 27, 2021, 5:38 PM IST

मुंबई - पेगासस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती बाबत राज्याचे गृहमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वागत केले आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, हे आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे आणि या प्रकरणांमध्ये केंद्र शासनाने स्वतःहून पुढे येऊन काय खरे..? आणि काय खोटे..? आहे हे सांगणे गरजेचे आहे. कार्यकक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठरवली असेत तर ठीक आहे. मात्र, या समिती कार्यकक्षा, कामाची पद्धती व नियम केंद्र सरकारने ठरवले असतील तर यातून काही निष्पन्न होईल, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

बोलताना गृहराज्यमंत्री पाटील

पेगासिसबाबत स्पष्टता करावी

सरकारने पेगासस विकत घेतली किंवा नाही. विकत घेतली असेल तर का घेतले कुणावर त्याचा वापर केला. वापर करताना काही अधिकार दिले त्याचा दुरुपयोग झाला हे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.

समितीला योग्य अधिकार असावेत

पेगासस प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीला सरकारने योग्य अधिकार द्यावेत. तसेच सरकारने या समितीच्या कक्षात ठरवताना राष्ट्रीय गोपनीयतेच्या नावाखाली त्यांचे पंख छाटून येत शक्य झाल्यास न्यायालयानेच समितीच्या कार्यकक्षा ठरवल्या तरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल अन्यथा ही समिती केवळ फार ठरेल, असेही पाटील यांनी मत व्यक्त केला आहे.

काय आहे पेगॅसस स्पायवेअर ?

पेगॅसस एक पावरफुल स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे, जे मोबाइल आणि संगणकामधून गोपनीय आणि वैयक्तीक माहितीची चोरी करते. तसेच ती माहिती हॅकर्सपर्यत पोहोचवता येते त्याला स्पायवेअर म्हटले जाते. असे म्हटेल जाते की हे सॉफ्टवेयर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमच्यावर पाळत ठेवते. इस्त्रायली कंपनी एनएसओ ग्रुपचा दावा आहे की, ते हे सॉफ्टवेअर जगभरातील सरकारला पुरवले जाते. याच्यामाध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम चालणारे मोबाईल हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर या फोनमधील डेटा, ई-मेल, कॅमरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह सर्व क्रियांची माहिती चोरली जाते.

'अशा' प्रकारे केली जाते हेरगिरी

जर हा पेगॅसस स्पायवेअर तुमच्या फोनमध्ये आला तर तुम्ही 24 तास हॅकर्सच्या देखरेखीखाली असाल. हे तुम्हाला पाठवलेला संदेश कॉपी करेल. हे आपले फोटो आणि कॉल रेकॉर्ड त्वरित हॅकर्ससकडे पाठवेल. तुमचे संभाषण रेकॉर्ड केले जाऊ शकते. तुम्हाला माहितही नसेल आणि पेगासस तुमच्या फोनवरून तुमचे व्हिडिओ बनवत राहील. या स्पायवेअरमध्ये मायक्रोफोन सक्रिय करण्याची क्षमता आहे. म्हणून कोणत्याही अज्ञात दुव्यावर क्लिक करण्यापूर्वी तपासा, त्याची खात्री करूनच त्याचा वापर करा

कसा होतो पेगॅससचा शिरकाव

जसे इतर व्हायरस आणि सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये येतात, पेगॅगस देखील कोणत्याही मोबाईल फोनमध्ये प्रवेश घेतात. इंटरनेट दुव्याद्वारे. हे लिंक्स मेसेज, ई-मेल, व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पाठवले जातात. पेगॅसस हेरगिरी पहिल्यांदा 2016 मध्ये उघड झाली. यूएईच्या मानवाधिकार कार्यकर्त्याने दावा केला की त्याच्या फोनवर अनेक एसएमएस आले, ज्यात लिंक देण्यात आल्या होत्या. जेव्हा त्यांनी ते तपासले, तेव्हा असे आढळून आले की त्या स्पायवेअरची लिंक आहेत.

हे ही वाचा - भारत सीरिजच्या देशातील पहिल्या वाहनाची नोंदणी मुंबईत..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.