ETV Bharat / state

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री - चक्रीवादळाचा धोका

राज्यावर कोरोनाचे संकट असताना चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन पूर्व तयारी करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jun 2, 2020, 7:14 AM IST

Updated : Jun 2, 2020, 8:26 AM IST

मुंबई - अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून दिली.

बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर वादळाचा धोका असलेल्या भागातील जिल्हाधिकारी यांनी चक्रीवादळ पुर्वतयारी व उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत बैठका घेतल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुका प्रशासनालाही योग्य सूचना दिल्या आहेत, तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याची माहीती थोरात यांनी आपल्या ट्विटरवर दिली आहे.
  • अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे.
    1. कोकण किनारपट्टीवर NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे.
    2. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत. pic.twitter.com/6vFXNReaJm

    — Balasaheb Thorat (@bb_thorat) June 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Coronavirus : राज्यात आज २ हजार ३६१ नवे पॉझिटिव्ह, 779 रुग्ण कोरोनामुक्त, 76 जणांचा मृत्यू

Last Updated : Jun 2, 2020, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.